शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सुलीभंजन रस्त्यावर बिबट्याचे पर्यटकांना जवळून दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:04 IST

औरंगाबाद : सुलीभंजनवरून दत्त मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर बिबट्याने काहीवेळ दर्शन देऊन तो घनदाट झाडीत निघून गेला. पर्यटकांनी गुरुवारी सकाळी ...

औरंगाबाद : सुलीभंजनवरून दत्त मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर बिबट्याने काहीवेळ दर्शन देऊन तो घनदाट झाडीत निघून गेला. पर्यटकांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता हे क्षण मोबाइलमध्ये कैद केले. बिबट्या रस्ता पार करीत असताना पर्यटकांनी वाहने थांबविली होती.

बिबट्याची अन्नसाखळी जुळली आहे. डोंगरावरील वनक्षेत्रात त्याचे वास्तव्य असून, शिकारीचा पाठलाग करीत तो रस्त्यावर आला असावा. त्यावेळी तो पर्यटकांच्या नजरेस पडला. काहीकाळ थांबून तो जंगलात निघून गेला. अचानक समोर बिबट्या पाहून पर्यटकांचे श्वासही गळ्यातच अडकला होता. काहींनी हिंमत करून हे क्षण मोबाइलमध्ये कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने सुलीभंजन परिसरातील वनरक्षक प्रशांत निकाळजे, आय्युब शाह नारायण जंगले, रहेमान शाह, वाल्मिक गवळे, बाबू भाई, काळे मामा, माजेद अली यांचे पथक शोधमोहिमेसाठी रवाना झाले.

सायंकाळपर्यंत शोधमोहीम...

बिबट्याचा या परिसरात अधिवास असून, तो स्वत:हून कुणावरही हल्ला करीत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट वनक्षेत्र असून तो तो चुकून रस्त्यावर आला असावा. मानसाची चाहूल लागल्याने तो पसार झाला. पावसाळी वातावरण असल्याने पर्यटकांची दिवसभर गर्दी होते. खबरदारी घेत वनविभाग तसेच ग्रामस्थांनी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविली. नागरिकांनीही त्याची छेड काढू नये दिसल्यास वनविभागाला कळवावे. असे वनरक्षक प्रशांत निकाळजे यांनी सांगितले.

दर्शनासाठी कुटुंबासह सहलीवर...

मारुती जंगले हे कुटुंबासह दर्शनासाठी गेले होते. सुलीभंजनकडून दत्तधाम मंदिराकडे येत असतांना सकाळी १०.३० वाजता बिबट्या रस्त्यावर जाताना दिसला. त्याला पाहून इतरही वाहने थबकली होती. असे नारायण जंगले यांनी सांगितले.

दिवसभर चर्चा...

१५ दिवसांपूर्वीच वेरूळच्या घाटात व लेणी परिसरात बिबट्या दिसून आल्याने वनविभागाने त्याचा माग काढला होता, परंतु तो आढळला नाही. गुरुवारी सकाळी बिबट्या सुलीभंजन दत्तधाम मंदिर रोडवर दिसून आल्याने दिवसभर याचीच सोशल मीडियावर चर्चा सुरू होती.

कॅप्शन....१) सुलीभंजन येथे बिबट्याचे गुरुवारी असे दर्शन झाले

२) वनविभागाचे वनरक्षक व ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन परिसरात शोध मोहीम राबविली. त्यावेळी घेतलेले छायाचित्र.