शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन राजधानीचा कचरा होऊ नये; पर्यटक व्यावसायिकांनी व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 18:40 IST

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी बिरुदावली मिरवणार्‍या औरंगाबाद शहराचा गेल्या काही दिवसांपासून जणू काही ‘कचरा’च झाला आहे. याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होणार अशी भीती या क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी बिरुदावली मिरवणार्‍या औरंगाबाद शहराचा गेल्या काही दिवसांपासून जणू काही ‘कचरा’च झाला आहे. याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होणार अशी भीती या क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

नारेगाव कचराडेपोमध्ये कचरा टाकू देण्यास नकार दिल्यामुळे शहरातील रस्त्यांवरच कचर्‍याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ राहिले बाजूला आणि सर्वत्र कचराच दिसत आहे. औरंगाबाद लेणी, पाणचक्की आणि बीबी का मकबर्‍याचे सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना कचर्‍यांचे हे ढीग पाहत जावे लागत आहे. पर्यटन राजधानीचे असे हाल पाहून पर्यटकांमध्ये नकारात्मक संदेश जात असून, कचराकोंडीवर लवकरच तोडगा निघाला नाही, तर पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.

कॅनडाहून आलेले पर्यटक अ‍ॅलन यंग यांनी भारताच्या विविध शहरांना भेटी दिलेल्या आहेत. मागच्या दोन दिवसांपासून ते शहरात आहेत. ‘भारत हा फार सुंदर देश आहे. तो अजून सुंदर होऊ शकतो. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या आधुनिक सुविधा अमलात आणण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले. यंग यांनी कॅनडात पत्रकारिता केलेली आहे. सध्या ते दुसर्‍यांदा भारत भेटीवर आलेले आहेत. त्यांचा अनुभव सांगताना ते म्हणाले, कचरा व्यवस्थापन हा गंभीर प्रश्न असून, त्यामध्ये केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी मुंबई, गोवा, कोची, भोपाळ, हैदराबाद, आग्रा, अहमदाबाद अशा विविध शहरांना भेटी दिलेल्या असून, त्यांच्या तुलनेत औरंगाबाद अधिक स्वच्छ असल्याचे सांगताना घनकचरा व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

अशीच भावना भारतीय पर्यटक आणि गाईड यांनीदेखील बोलून दाखविली. ‘रस्त्यावर कचर्‍याचे ढीग साचने हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत वाईट चित्र आहे. कचराकोंडी अशीच कायम राहिली, तर पर्यटनस्थळांभोवतीही कचरा साचू लागेल. तेव्हा काय करणार?’ असा सवाल गाईड आणि पर्यटक व्यावसायिकांनी केला. ऐतिहासिक पर्यटन शहर म्हणून औरंगाबादचा प्रचार केला जातो. तेथेच सर्वत्र कचरा दिसत असेल तर पर्यटकांनी का म्हणून येथे यावे? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.

आता कचर्‍याची भर नकोदळणवळणाची असुविधा आणि मार्केटिंग नसल्यामुळे आधीच औरंगाबाद शहरातील पर्यटनाचा हंगाम नऊ महिन्यांऐवजी तीन महिन्यांवर आला आहे. त्यात कचर्‍याची भर पडून हे तीन महिनेदेखील हातचे जायला नकोत.- जसवंत सिंग, पर्यटन व्यावसायिक

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका