शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

तूर वजनात ‘गोलमाल’!

By admin | Updated: March 25, 2017 23:11 IST

लातूर :एकीकडे नाफेडने शेतकऱ्यांची लूट केली तर दुसरीकडे गोदामातील तुरीचे वजन घटल्याने सरकारची फसवणूक होत आहे़

लातूर : शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने तुरीला ५ हजार ५० रूपये हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्रावरच विक्री करण्याचे आवाहन केले़ मात्र हमीभाव खरेदी केंद्रावर एका कट्ट्याच्या पाठीमागे जवळपास १ किलो २०० ग्रॅम ज्यादा तूर घेऊन शेतकऱ्यांना लुटले़ तर विदर्भ को-आॅप़ मार्केटिंग फेडरेशनने वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या तुरीच्या एका कट्ट्यात एक किलोची तूट झाल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे एकीकडे नाफेडने शेतकऱ्यांची लूट केली तर दुसरीकडे गोदामातील तुरीचे वजन घटल्याने सरकारची फसवणूक होत आहे़जिल्ह्यात नाफेड अंतर्गत आठ हमीभाव खरेदी केंद्र आहेत़ या केंद्रावर आजपर्यंत ११ हजार ८०० शेतकऱ्यांची १ लाख ८० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, १ हजार शेतकऱ्यांना ७४ कोटी रूपये देण्यात आले आहेत़ १५ कोटी रूपये थकीत आहेत़ तसेच लातुरात विदर्भ को-आॅप़ मार्केटिंग फेडरेशन मार्फत पाच हजार शेतकऱ्यांची ९६ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़ खरेदी केलेली तूर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आली़ नाफेड अंतर्गतच्या केंद्रांनी बारदाण्यासह ५० किलो ६०० ग्रॅम तूर खरेदी करणे अपेक्षित असताना या केंद्रावर ५१ किलो २०० ग्रॅमपर्यंत तूर घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक लक्ष्मण वंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती़ (अधिक वृत्त हॅलो/२वर)