शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळीचे कट्टे रेशन दुकानांवरच पडून!

By admin | Updated: September 7, 2016 00:38 IST

औरंगाबाद : व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा भाव कमी केल्यामुळे त्याचा फटका रेशनवरील तूर डाळीस बसत असून या डाळीला उठावच नाही.

औरंगाबाद : व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा भाव कमी केल्यामुळे त्याचा फटका रेशनवरील तूर डाळीस बसत असून या डाळीला उठावच नाही. त्यामुळे रेशन दुकानावर तूर डाळीचे कट्टे जसेच्या तसे पडून आहेत. रेशन दुकानावर तूर डाळ उपलब्ध करून देताच व्यापाऱ्यांनी ८० ते १०० रु. प्रतिकिलो दराने विक्री सुरूकेली. त्यामुळे रेशनवरील १०३ रु. किलो दराने मिळणारी डाळ खरेदी करण्यास रेशन कार्डधारक तयार नाहीत. तूर डाळीचे भाव नियंत्रणात येत नसल्यामुळे सरकारने खुल्या बाजारात सुरुवातीला १२० रु. किलो दराने ही डाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. सरकार बाजारात तूर डाळ आणणार असल्याचे समजताच व्यापाऱ्यांनी त्यांचा नफा कमी केला. हळूहळू तूर डाळीचे भाव नियंत्रणात येताच सरकारनेही १२० रुपयांऐवजी ९५ रु. किलो दराने मॉलमध्ये तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. तसेच रेशन दुकानातून बीपीएल आणि अंत्योदय लाभार्र्थींसाठी तूर डाळ देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र बाजारात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या तूर डाळीपेक्षा जास्त भावाने म्हणजे १०३ रुपये प्रतिकिलो असा भाव ठेवला. मॉलमध्ये स्वस्त आणि रेशन दुकानावर महाग अशी चर्चा सुरूझाली. रेशन दुकानदारांनीही सावध भूमिका घेत १-२ क्विंटल एवढीच तूर डाळ उचलली आणि आता तर ही डाळ रेशन दुकानांवरच पडून आहे. दुकानापर्यंत डाळ आणण्यासाठी प्रतिक्विंटल २५ रु. ट्रान्सपोर्ट जास्तीचा करावा लागतो. रेशनकार्डधारकांकडून डाळीला मागणी नसल्याने आठवडाभरापासून ती दुकानांतच पडून आहे. डाळ जुनी झाली की, त्यातील ओलसरपणा कमी होऊन ती वाळेल. म्हणजे वजन कमी होईल. सरकारला डाळ परत करताना प्रतिक्विंटलमागे मोठी घट होईल. त्याचा भुर्दंडही वेगळा पडेल, यामुळे रेशन दुकानदारही धास्तावलेले आहेत.