सोमनाथ खताळ , बीडनुकतेच महाविद्यालयांतील प्रवेश बंद झाले असून तासिकेला सुरूवात झाली आहे. अकरावीपासून ते पदव्युत्तर विद्यार्थी तासिकेसाठी गर्दी करू लागले आहेत. तासिका संपल्यानंतर इतर व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा शहरात पाचशे ते सहाशे विद्यार्थी महाविद्यालयाच्या गं्रथालयात जाऊन पुस्तके वाचण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. अभ्यासाच्या पुस्तकांबरोबरच स्पर्धा परीक्षांचे पुस्तके वाचण्यात विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.आता प्रत्येक विद्यार्थी हा आपले ध्येय आतापासूनच निश्चित करू लागला असल्याचे दिसून येत आहे. कोणी आयपीएस, आयएएस तर कोणी डॉक्टर, इंजिनीअर, पोलिस बनण्याचे स्वप्न पहात आहे. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आता विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. महाविद्यालयात तासिका करण्याबरोबरच इतर अभ्यासही करण्याकडे विद्यार्थ्यांनी अधिक पसंती दिली आहे. अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांचे पुस्तके वाचण्यास सुरूवात केली आहे. विद्यार्थ्यांची मागणी पाहता त्यांना महाविद्यालयाकडून वेगवेगळे पुस्तके उपलब्ध करून दिले जात असल्याचे ग्रंथालय प्रमुख एस.आर. वाघ यांनी सांगितले. वर्तमानपत्रे वाचूनच अभ्यासाला सुरूवातग्रंथालयात वाचनासाठी येणारे अनेक विद्यार्थी हे आगोदर वर्तमान पत्रे वाचून जगात काय घडामोडी घडल्या आहेत, याचे वाचन करतात. वर्तमान पत्रे वाचून झाल्यावरच इतर पुस्तकांचे वाचन करीत असल्याचे प्रा. थोरात यांनी सांगितले. अशी आहे वाचक विद्यार्थ्यांची संख्यास्पर्धा परीक्षांचे पुस्तके २००, जनरल, ५०० तर अनेक विद्यार्थी स्वत:चे पुस्तके आणून येथे वाचन करतात. दररोज सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थी या वाचन कक्षात येऊन वाचन करीत असतात. आलेल्या विद्यार्थ्यांची नोंद केली जात असल्याचे प्रा.थोरात यांनी सांगितले.काय म्हणतात अभ्यासू विद्यार्थी...?मी दररोज आले की पहिले वर्तमान पत्रे वाचते. जगात काय घडामोडी घडल्या आहेत, हे वर्तमान पत्रांच्या माध्यमातून समजते. दररोज चार तास अभ्यास करीत असून जनरल व स्पर्धा परीक्षांचे पुस्तके वाचते.-प्रियंका मस्केमी जनरल पुस्तके अनेकवेळा वाचले आहेत. आता हे पुस्तके बाजूला ठेवून भारतीय राज्यघटना काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. लवकरच हे पुस्तक सुद्धा वाचून पूर्ण होईल. मला मोठे अधिकारी बनायचंय. चार ते पाच तास अभ्यास करते.-अश्विनी वाघमारेमी तासिका संपल्या की थेट ग्रंथालयात येऊन अभ्यास करीत बसतो. चार तास अभ्यास केल्यानंतरच मी उठतो. मला प्रा. शैलेश आकुलकर यांचे मार्गदर्शन लाभते. स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाचणे मी अधिक पसंत करतो.- अक्षय आव्हाडआम्हाला येथील ग्रंथालयात विविध पुस्तके उपलब्ध करून देतात. आम्हाला आवश्यक त्या सुविधाही मिळतात. मी जास्तीत जास्त जनरल पुस्तके वाचणे अधिक पसंत करतो.- ज्योतीराम कुरुळेविद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील असे पुस्तके उपलब्ध करून देतो. तसेच विद्यार्थी जनरल पुस्तके वाचण्यातही अधिक मग्न असतात, त्यामुळे आम्ही विविध भाषेतील पुस्तके त्यांच्यासाठी उपलब्ध करून देतो. गडबड गोंधळ, अभ्यासात विद्यार्थ्यांना अडथळा होऊ नये, म्हणून प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.- प्राचार्य डॉ. वसंत सानप
स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचण्याकडे कल
By admin | Updated: July 21, 2014 00:20 IST