शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामाची पालिकेत लगीनघाई

By admin | Updated: April 15, 2017 23:48 IST

जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी जालना पालिकेला दिलेले उद्दिष्ट ३१ मार्च अखेर पूर्ण होऊ शकले नाही.

जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी जालना पालिकेला दिलेले उद्दिष्ट ३१ मार्च अखेर पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे एप्रिल अखेर तरी उद्दिष्ट पूर्ण व्हावे म्हणून पालिकेत शौचालय बांधकाम संदर्भात एकच लगीनघाई सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान पालिका सांगत असलेला आकड्यातही मोठ तफावत असल्याचे दिसून येते. शौचालयांची कामे गतीने करण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. पालिकेकडून पाठपुरावा करण्यात येत असला तरी काही नागरिकांनी अनुदानाचे पैसे उचलूनही शौचालय बांधकाम केले नाही. त्यामुळे शहरातील १३ हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. मार्च अखेर सात हजार पेक्षा अधिक शौचालयांची कामे झाल्याचा पालिकेकडून होत असला तरी यातही मोठा घोळ आहे. अनेक कामे अर्धव असून, उद्दिष्टपूर्तीसाठी अर्धवट अथवा जुने बांधकाम नवीन दाखविण्यात आले आहे. शहरातील बांधकामाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गत दोन ते तीन महिन्यांपासून पालिका शौचालय बांधकामासाठी पुढाकार घेत असली तरी अपेक्षित यश मिळविता आलेले नाही. परिणामी शहर हागणदारीमुक्त होते की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता विभागासह कर विभागालाही शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. कर विभागाने ५५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचे सांगण्यात येते.दरम्यान, स्वच्छता सभापती मुजीब लोहार तसेच स्वच्छता विभागातील निरीक्षकांनी शौचालय बांधकाम आढावा तसेच शहरातील स्वच्छतेबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या. या बैठकीस विविध प्रभागातील नगरसेवकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)