शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासाठी आता ‘घडीपत्रिका’

By admin | Updated: December 11, 2014 00:42 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जास्तीत जास्त गावे निर्मलग्राम व्हावीत तसेच घर तिथे शौचालय बांधले जावे़ यासाठी येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जास्तीत जास्त गावे निर्मलग्राम व्हावीत तसेच घर तिथे शौचालय बांधले जावे़ यासाठी येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा व स्वछता कक्षाच्या वतीने अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे़ शौचालय बांधकामासाठी आता ‘घरीपत्रिका’ मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात येत असून बांधा, वापरा अन् निरोगी रहा, असा नारा देण्यात येत आहे़तालुक्यातील मोठी गावे निर्मलग्राम व्हावीत़ त्याचबरोबर अनुदानावरील कमी खर्चाचे दोन खड्ड्यांचे ग्रामीण शौचालय बांधले जावे़ यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, मोहन अभंगे, विस्तार अधिकारी बालाजी पोतदार यांनी युनिसेफच्या तांत्रिक सहकार्याने तयार करण्यात आलेल्या दोन भागातील घडीपत्रिका सचित्र डायरीचा उपयोग सुरु केला आहे़ स्वच्छता कक्षाचे विस्तार अधिकारी गोविंद सूर्यवंशी, बालाजी गव्हाणे, विनोद कल्लेकर, रमेश पोरे, विनोद महानवर यांचे पथक तयार करून प्रत्येक कुटुंबाला घरी पत्रिका भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला़या पत्रिकेत शौचालय कसे बांधावे, खड्डे कसे तयार करावे, कमी खर्चात दर्जेदार शौचालय बांधून त्याचा वापर कसा करावा, याची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे़ बांधकामासंबंधी सहा भागात तर वापरासंबंधी नऊ भागात माहिती देण्यात आली असल्याने शौचालय बांधकामाची चळवळ गतीमान होण्यास मोठी मदत होत आहे़ त्यामुळे विविध गावातील शौचालय बांधकाम करणाऱ्यांकडून घडीपत्रिकेची मागणी होत आहे़ (वार्ताहर)४दरम्यान, घडीपत्रिका वापरून तालुक्यातील बाकली, बिबराळ, येरोळ, हिप्पळगाव, शिवपूर, हालकी, शिरूर अनंतपाळ, वांजरखेडा या आठ गावांत सुरु असलेल्या शौचालय बांधकामाचा आढावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम पटवारी, समन्वयक प्रमोद हुडगे यांनी मंगळवारी स्वच्छता कक्षासंबंधी माहिती दिली़