शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वाशीमध्ये दोन्ही काँगे्रस एकत्र

By admin | Updated: March 14, 2017 23:56 IST

वाशी : येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत शिवसेनेला विरोधी बाकावर बसविले.

वाशी : येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत शिवसेनेला विरोधी बाकावर बसविले. सभापतीपदी राष्ट्रवादीच्या भाग्यश्री हाके तर उपसभापतीपदी काँग्रेसचे विष्णु मुरकुटे यांची वर्णी लागली आहे. वाशी पंचायत समितीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसकडे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. आघाडीसाठी शिवसेनेच्या वतीने जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, प्रचारादरम्यान शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनी पारगाव येथील सभेत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्यावर टिका केल्यामुळे संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली. दरम्यान, मंगळवारी तहसीलदार शोभा पुजारी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडून सरमकुंडी गणातील भाग्यश्री हाके यांनी तर शिवसेनेकडून तेरखेडा गणातील रूपाली घोलप यांनी अर्ज दाखल केले. उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून विष्णु मुरकुटे यांनी व शिवसेनेकडून सविता तळेकर यांनी नामनिर्देशनपत्र भरले. हात वर करून मतदान घेण्यात आले असता सभापती व उपसभापतीपदासाठी प्रत्येकी चार मते मिळाली. तर तर विरोधात दोन मतदान झाले. त्यामुळे सभापतीपदी भाग्यश्री हाके तर उपसभापतीपदासाठी विष्णु मुरकुटे यांची निवड झाली. निवडीनंतर आ. राहूल मोटे व जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत चेडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बिभीषण खामकर, जि.प.सदस्य मधुकर मोटे, काकासाहेब चौधरी, वडजीचे उपसरपंच सुनिल जाधवर, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष शामराव शिंदे, मनिष भराटे, रणजित गायकवाड, काकासाहेब मोेरे, मच्छिंद्र कवडे, कृषी उत्पन्न बाजर समितीचे सभापती प्रकाश मोटे,उपसभापती बी. एस. भराटे, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष नितीन चेडे, गटनेते नागनाथ नाईकवाडी, नगरसेवक प्रसाद जोशी, सचिन येताळ, सुनिल पाटील, बाळासाहेब जाधव, हरिदास गायकवाड आदींची उपस्थिती होती. दरम्यान, पहिली अडीच वर्ष राष्ट्रवादीचा सभापती तर दुसऱ्या अडीच वर्षात काँग्रेसला संधी दिली जाणार असल्याचे समजते.