शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई कारखान्यासाठी आज मतदान

By admin | Updated: January 15, 2017 01:03 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे

अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपचे रमेश आडसकर व दत्तात्रय पाटील आमने-सामने आहेत. काँग्रेस आडसकरांच्या तर राष्ट्रवादी दत्ता पाटलांच्या पाठीशी उभी राहिल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. ४५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र अंबाजोगाई, परळी, केज, धारूर, रेणापूर या पाच तालुक्यातील असून ३४४ गावांचा कार्यक्षेत्रात समावेश आहे. तर १८५०० मतदार आहेत. रविवारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अंबासाखरच्या निवडणुकीसाठी प्रारंभीपासूनच आडसकर विरुद्ध पाटील ही दोन्ही पॅनलची लढत पारंपारिकपणे चालत आलेली आहे. कै. डी. एन. पाटील हे साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते तर पुढे माजी आ. स्व. बाबुराव आडसकर यांनी हा साखर कारखाना आपल्या ताब्यात घेतला. आजही या साखर कारखान्यांवर आडसकरांचेच वर्चस्व आहे. जुने सहकारी व नवीन कार्यकर्त्यांची मोठी फौज घेऊन रमेश आडसकर मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख, हनुमंत मोरे, राष्ट्रवादीचे विलास सोनवणे यांचे पाठबळ असून, पालकमंत्री पंकजा मुंडे याही त्यांच्या मागे उभ्या आहेत. दत्तात्रय पाटील यांनीही परळी येथील काँग्रेसचे राजेश देशमुख, नंदकिशोर मुंदडा, जि. प. सभापती बजरंग सोनवणे, भाजपाचे राजेश कराड, शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट या सर्वांना सोबत घेऊन मोट बांधली आहे. (वार्ताहर)