शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

आजचे राशीभविष्य दि. 4 डिसेंबर 2020 डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद

By | Updated: December 4, 2020 04:09 IST

डॉ. मनीषा देशपांडे, शुक्रवार, दि. ४ डिसेंबर २०२० राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन १३, १९४२. तिथी : कार्तिक कृष्ण ...

डॉ. मनीषा देशपांडे,

शुक्रवार, दि. ४ डिसेंबर २०२०

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन १३, १९४२. तिथी : कार्तिक कृष्ण चतुर्थी. श्री शालिवाहन शके १९४२. शार्वरी नाम संवत्सर, नक्षत्र: दुपारी १:३९ पर्यंत पुनर्वसू. त्यानंतर पुष्य. रास: सकाळी ७:२२ पर्यंत मिथुन. त्यानंतर कर्क. आज: चांगला दिवस. संकष्ट चतुर्थी. राहू काळ: सकाळी १०:३० ते १२ (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

.........................................

मेष :

चांगली बातमी ऐकायला मिळेल. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. काही घरांत नवीन खरेदीचे बेत ठरतील. मुलांना मनासारखा दिवस घालवण्यास मिळेल. व्यापार, व्यवसायात पण चांगला दिवस राहील.

वृषभ :

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल. तुम्ही काही विशेष कामासाठी प्रकल्प तयार करत असाल तर त्यातपण यश मिळेल. भावंडांशी बिघडलेले संबंध सुधारतील. मनासारखे भोजन मिळेल.

मिथुन :

आर्थिक बाजू मजबूत होईल. अपेक्षित असलेले काही पैसे वसूल होतील. मोठ्यांच्या मदतीने आपण काम पूर्ण करू शकाल. महिलांना त्यांचे गुण दाखविण्याची संधी मिळेल.

कर्क :

आवडीच्या विषयात काम करता येईल. कला, खेळ व गणित विषयाशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळेल. मुलांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळेल. एकूण दिवस आनंदी असेल.

सिंह :

आक्रमकपणे काही निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही आज स्वतःला सिद्ध केले नाही तर अपेक्षित यश मिळणार नाही. घरच्यांची चांगली साथ मिळेल. काहींना कायदेशीर मदत घ्यावी लागेल.

कन्या :

ज्येष्ठांना नातवंडांचे कौतुक करण्याची संधी मिळेल. जे नातवंडांची वाट पाहत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळेल. घरातील मोठ्यांचा खर्च आज वाढेल. इतरांना दिवस कामाचा पण समाधानाचा जाईल.

तुळ :

व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल. विशेषतः कापड व्यावसायिकांना दिवस जास्तच चांगला जाईल. फारसे वाद न होता सरकारी कामे होतील. नोकरदारांना काम कमी असल्याने रिकामा वेळ मिळेल. कलाकारांना भावनेपलीकडे जाऊन काम मिळवता येईल.

वृश्चिक :

बाहेरगावी फिरायला जाण्याचा बेत ठरेल. घरात कोणी आजारी असेल तर त्यांच्या तब्येतीत फरक पडेल. नोकरदार वर्गाला काही प्रशिक्षण किंवा कार्यशाळेसाठी हजर राहावे लागेल.

धनू :

कर्जाशी संबंधित कामे पूर्ण होतील. नवीन काम हाती घेताना मात्र कागदपत्रे नीट तपासून बघा. नातेवाईकांची गाठभेट होईल‌. जुन्या आठवणीत रमाल. काहींना आर्थिक मदत मिळू शकते.

मकर :

इच्छुकांचे विवाह ठरतील. व्यवसायात अपेक्षित बदल करावा लागेल. काही व्यापाऱ्यांना नवीन माल भरावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मेहनत करावी लागेल.

कुंभ :

सर्दीचा त्रास वाढेल. कामाचा ताण पण वाढेल. नवीन कामे अंगावर ओढवून घ्याल. त्याचा मन:स्ताप होईल. मुलांच्या काही मागण्या पूर्ण कराव्या लागतील. स्पर्धा किंवा शर्त मात्र जिंकाल.

मीन :

ऐकावे जनाचे, करावे मनाचे.

लोकांच्या बोलण्याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून लक्ष देऊ नका. नाही तर काही जणांची चिडचिड वाढेल. काहींना थकवा जाणवेल. शक्यतो मनातील बोलून स्वतःला मोकळे करा. मनात गोष्टी साठवून ठेवण्याचा त्रास होईल.