हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंचच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी हिंगोलीत पूजाथाळी सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील केमिस्ट भवन येथे दुपारी ३ वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे.पूजाथाळी सजावट स्पर्धेसाठी स्पर्धकांना २० मिनिटांचा अवधी दिला जाईल. सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांना स्वत: आणावे लागणार आहेत. दुसरीकडे रांगोळीत स्पर्धकांना ४५ मिनिटात ‘गणपती’ या विषयावर रांगोळी साकारावी लागणार आहे. याही स्पर्धेत महिलांनी रांगोळी सोबत आणावी. शिवाय स्पर्धकांना १५ मिनिटांपूर्वी ओळखपत्रासह स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे लागणार आहे. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व हिंगोली जिल्हा डान्स अकॅडमीने स्वीकारले आहे. (प्रतिनिधी)
हिंगोलीत आज सखींसाठी स्पर्धा
By admin | Updated: September 6, 2014 00:27 IST