लोकमत न्यूज नेटवर्कबीड : थोर राष्ट्रसंत भगवानबाबा यांचा १२१ वा जन्मोत्सव सोहळा शनिवारी सावरगाव घाट येथे मोठ्या उत्साहात होत आहे. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी ६ वा. बाबांच्या मूर्तीस अभिषेक, ७ वाजता त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता आळंदी देवाची येथील ह.भ.प. लक्ष्मण पाटील महाराज यांचे कीर्तन होणार आहे.विविध विकास कामांचा शुभारंभही यावेळी होणार आहे. याप्रसंगी पंकजा मुंडे यांच्यासह आ. भीमराव धोंडे, हनुमानगडाचे बुवा महाराज खाडे, सामाजिक कार्यकर्ते विजय गोल्हार आदी उपस्थित राहणार आहेत. या जन्मोत्सव सोहळ्यास भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.पुतळ्याचे अनावरणआष्टी तालुक्यातील मातावळी येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी दुपारी २ वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही गावकºयांच्या वतीने करण्यात आले आहे.जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरबीड येथे जन्मोत्सवानिमित्त जय भगवान महासंघ व भगवान सेवा आयोजित रक्तदान शिबीर पार पडले. महासंघाचे जिल्हा प्रमुख बप्पासाहेब घुगे, अॅड. तेजस नेहरकर यांनी रक्तदान करुन शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरात ३० ते ४० युवकांनी रक्तदान केले.शिबिरास डॉ. अरुण घुगे, प्रा. सोमनाथ बडे, नेकनूर पोलीस स्टेशनचे मुंडे, सोनवणे आदी मान्यवरांनी भेट दिली. शिबीर यशस्वीतेसाठी वीरेंद्र सानप, आकाश कंडरे, साहेबराव पोपळे, शेख गनीभाई, भिक्कू शिंदे, सुदेश मुंडे, सर्जेराव गमे, सनी थोरात, बापू वाळके, डोईफोडे, शेख अजीम, बाळू मुंडे यांच्यासह जय भगवान महासंघ व भगवान सेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.शनिवारी दुचाकी रॅलीया जन्मोत्सवांतर्गत शनिवारी सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. रात्री ७.३० वाजता ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन भगवानबाबा चौकात आयोजित करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
राष्ट्रसंत भगवानबाबांचा आज जन्मोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:03 IST