बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड शुक्रवारी होणार आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ एकवरून पाच वर्षे झाल्याने कोणाच्या गळात माळा पडतात ? याची संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता आहे. कारभारी होण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नियमबाह्य कर्ज वाटप झाल्याचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर संचालक मंडळाने राजीनामा दिला होता. परिणामी बँकेवर प्रशासक नेमावा लागला. दरम्यान, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी ५ मे रोजी मतदान झाले होते. १९ पैकी १६ जागांवर भाजपप्रणित आघाडीने यश मिळविले होते. माजी मंत्री प्रकाश सोळंके, आ. अमरसिंह पंडित यांच्या गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. शुक्रवारी अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होत असून प्रशासक नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत, नवनिर्वाचित संचालक हे अध्यक्ष पदाचा फॉर्म दाखल करतील. एक पेक्षा अधीक अर्ज आले तर गुप्त मतदान घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारीव्ही.एस.जगदाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या रेसमध्ये अनेक मातब्बरांनी उडी घेतली आहे.४अध्यक्षपदासाठी अंबाजोगाईचे कृउबा सभापती दत्ता पाटील, सर्जेराव तांदळे, ऋषीकेश आडसकर, संध्या वनवे हे स्पर्धेत आहेत.४आरबीआयच्या परवानगीशिवाय संचालक मंडळाकडे पदभार देण्यास जालिंदर पिसाळ यांनी विरोध दर्शवत तक्रार दाखल केली आहे.
आज कारभारी ठरणार
By admin | Updated: May 15, 2015 00:51 IST