नांदेड : लोकमत सखीमंच आयोजित 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण श्री अंबिका मंगल कार्यालय येथे सोमवारी दुपारी ४ वाजता होणार आहे़ लोकमत सखीमंचच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात़ मनोरंजन, विविध स्पर्धांच्या माध्यमातून सखींच्या आवडीनिवडी व कलागुणांना वाव देण्यासाठी खास व्यासपीठ उभे केले आहे़ सामाजिक, मनोरंजन, बुद्धीला चालना देणारे अनेक उपक्रम यावर्षी राबविण्यात आले़ त्याचाच एक भाग म्हणून या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे़ संदीप पाठक हे 'वऱ्हाड निघालंय लंडनला' नाटक सादर करणार आहेत़ या नाटकामध्येच लकी ड्रॉची सोडतही जाहीर होईल़ नशीबवान विजेत्यांची नावे यावेळी घोषित केली जातील़ तरी सर्व सखीमंच सदस्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे़ कार्यक्रमस्थळी येताना सखीमंचचे ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे़ (प्रतिनिधी)
सखींसाठी आज 'वऱ्हाड निघालंय लंडनला'
By admin | Updated: July 14, 2014 01:02 IST