शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

आज ‘रिमझिम गाणी झलक सुहानी..’

By admin | Updated: July 25, 2016 01:04 IST

औरंगाबाद : आला पुन्हा तो नव्यानं.. ओला मातीचा सुगंध.. मन झाले एकवार.. पुन्हा बेहोश बेधुंद.. पावसामुळे निसर्गाने जणू हिरवा शालू पांघरला आहे.

औरंगाबाद : आला पुन्हा तो नव्यानं.. ओला मातीचा सुगंध.. मन झाले एकवार.. पुन्हा बेहोश बेधुंद..पावसामुळे निसर्गाने जणू हिरवा शालू पांघरला आहे. रसिकतेला फुलविणाऱ्या या रोमांचक वातावरणात हळूच सुरेल तान कानावर पडावी अन् मन बेभान होऊन नाचू गाऊ लागावे असे वाटते. नेमका या वातावरणाचा रंग आणि आपल्या असंख्य प्रेक्षकांच्या मनातील भाव ओळखून पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच घेऊन येत आहे ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’.गोवा आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचने आपल्या सदस्यांसाठी विविधरंगी कार्यक्रम देऊन त्यांच्या मनात घर केलं, त्याचप्रमाणे कलर्सने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कलर्स व लोकमत सखी मंच आपल्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात असणार आहेत आपल्या मनातली पाऊस गाणी आणि सोबतच नृत्याची ‘झलक दिखला जा’ स्पर्धा. पुन्हा एकदा कलर्स चॅनलवर ३० जुलै, शनिवारपासून रात्री १० वा. ‘झलक दिखला जा हॉट है’ हा शो सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडेल तसेच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस या कार्यक्रमाची सेलिब्रिटी जज असणार आहे. तिच्या सहभागाने या कार्यक्रमाला आलेले एक ग्लॅमरस आणि सिझलिंग स्वरूप या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल. याशिवाय दिग्दर्शक करण जोहर, कोरिओग्राफर गणेश हेगडे हे सुद्धा परीक्षकांच्या भूमिकेत धमाल करताना दिसणार आहेत. एकूण १२ सेलिबिटीज या कार्यक्रमात सहभागी होणार असून यात सुरवीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा- प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपालसिंग सोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसुफ खान, सिद्धांत गुप्ता आणि शंतनू माहेश्वरी आदींचा समावेश आहे. दि. २५ जुलै रोजी सायं. ४ : ३० वा. संत तुकाराम नाट्यगृह (सिडको) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व सखी मंच सदस्यांसाठी हा कार्यक्रम खुला आहे.