शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रस्ते काँक्रिटीकरणाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:48 IST

शहरात पहिल्या टप्प्यात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या रस्त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी दुपारी १ वाजता महावीर चौक येथे करण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना :    शहरात पहिल्या टप्प्यात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या रस्त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी दुपारी १ वाजता महावीर चौक येथे करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.खा. दानवे म्हणाले की, शहरातील अंतर्गत जलवाहिनीसाठी दीडशे कोटी रुपये, भूमिगत गटार योजनेसाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणल्यानंतर आता शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात सभागृह उभारणीसाठी १० तर शहरातील सिमेंट रस्त्यांसाठी पुन्हा १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी जालना जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. शहरातील वृंदावन सभागृहात दुपारी १ वाजता मुख्यमंत्री शहरातील व्यापारी, उद्योजक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधतील. गतवर्षी विकास परिषद घेऊन त्यात नागरिकांनी केलेल्या सूचनांनुसार बहुतांश विकासकामे प्रस्तावित आहेत. त्यानंतर ७ आॅक्टोबर रोजी पुन्हा बैठक घेऊन नागरिकांशी चर्चा केली. त्यांनी केलेल्या सूचनांची टिपणी तयार केली असून, ती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे खा. दानवे म्हणाले. दरम्यान, महावीर चौकात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहरातील रस्ते काँक्रिटीकरणाचे लोकार्पण केले जाणार असून, याप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केल्याचे खा. दानवे यांनी सांगितले. त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव व देळेगव्हाण येथील गटशेतीची पाहणी करणार आहेत. देळेगव्हाण येथील जयभवानी विद्यामंदिर येथे दुपारी २ वाजता येथे जलयुक्त शिवारमधून झालेल्या जलसाठ्याचे पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. दानवे यांनी देळगव्हाण येथे होणा-या कार्यक्रमस्थळाची पाहणीही केली.