शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आज औरंगाबाद महामॅरेथॉनचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:39 IST

लोकमत समूहातर्फे आयोजित महामॅरेथॉनच्या थरारास गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथून उद्या, रविवारी भल्या पहाटे प्रारंभ होणार आहे.

औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे आयोजित महामॅरेथॉनच्या थरारास गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथून उद्या, रविवारी भल्या पहाटे प्रारंभ होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रच नव्हे, तर पूर्ण देशभरातून आणि परदेशातील असे साडेसात हजार धावपटू उद्या धावणार आहेत. यंदा संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड आणि विशेष दलातील धावपटूंना विशेष बक्षीस दिले जाणार आहे. गतवर्षी या महामॅरेथॉनमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदवला होता. यंदा मात्र साडेसात हजारांपेक्षा विक्रमी सहभाग असणार आहे.महामॅरेथॉनला सकाळी ६ वाजता २१ कि. मी. अंतराच्या अर्धमॅरेथॉनने सुरुवात होणार आहे. १0 कि. मी. अंतराची मॅरेथॉन सकाळी ६.१५ आणि ५ व ३ कि. मी. अंतराच्या मॅरेथॉनला सकाळी ७ व ७.१0 वाजता सुरुवात होणार आहे.उद्घाटन सोहळ्यास मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि अभिनेता देवदत्त नागे यांची उपस्थिती हे आकर्षण ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्यास महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे, पोलीस उपआयुक्त दीपाली घाडगे, पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. शिवकांत बाजपेयी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. बक्षिसांचे वितरण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाठ, आ. सतीश चव्हाण, आ. अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९.३0 वाजता होणार आहे.