लोकमत न्यूज नेटवर्कबीड: तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे श्री मन्मथ स्वामी यांच्या पावन भूमीमध्ये डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचे ८१ वे श्रावणमास मौन तपोनुष्ठान सुरु आहे. याची सांगता सोमवारी होणार आहे. यावेळी मन्मथस्वामी यांच्या समाधी स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. राज्याच्या कानाकोपºयातून हजारो भाविकांची उपस्थिती राहणार आहे.सुख, शांती व एकात्मतेसाठी हा सोहळा कपिलधार येथे होत आहे. कार्यक्रमासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संभाजीराव पाटील निलंगेकर, महादेव जानकर, खा. डॉ. सुनिल गायकवाड, आ. जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बस्वराज पाटील, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, विनायक पाटील आदींची उपस्थित राहणार आहेत. तपोनुष्ठान कार्यक्रमाची सांगता शिवराज अप्पा नावंदे यांच्या कीर्तनाने होणार आहे. अहमदपूर येथून शेकडो स्वयंसेवक दाखल झाले आहेत. स्वयंसेवक आणि पोलीस दर्शन व्यवस्था सांभाळतील.
आज तपोनुष्ठान सोहळ्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:04 IST