शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून जिल्ह्यातील ६१६ दारू दुकाने बंद

By admin | Updated: April 1, 2017 00:16 IST

लातूरराष्ट्रीय व राज्य महामार्गालगतच्या ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या दारू दुकाने बंद होणार की नाही यावर महिनाभरापासून गुऱ्हाळ सुरू होते़

हरी मोकाशे  लातूरराष्ट्रीय व राज्य महामार्गालगतच्या ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या दारू दुकाने बंद होणार की नाही यावर महिनाभरापासून गुऱ्हाळ सुरू होते़ मात्र शुक्रवारी रात्री अचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही दारू दुकाने शनिवारपासून बंद करावीत, असे आदेश दिले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील ६१६ दारू दुकानांचे कुलूप शनिवारी निघणार नाही़सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ५०० मिटर अंतराच्या आतील दुकाने बंद करण्याच्या हालचाली मार्चच्या सुरूवातीपासून सुरू झाल्या होत्या़ दरम्यान, लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदणी असलेल्या ६६४ पैकी ६१३ बार, परमिट रूम, देशी दारू दुकान क्लबला नोटिसा बजावल्या होत्या़ त्यामुळे १ एप्रिलपासून ही दारू दुकाने बंद होणार असे गृहित धरले जात होते़ दरम्यान, राज्य सरकारने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परमिट रूम्स सुरू राहतील, असे स्पष्ट करीत नूतनीकरण करून घेण्याचे आदेश दिले होते़ त्यामुळे दारू दुकानदारांना दिलासा मिळाला़ परिणामी, लातुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे नूतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्यास सुरूवात केली होती़ त्यातील काही प्रस्तावांचे नूतनीकरणही झाले आहे़ शुक्रवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त संजीवकुमार यांनी राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ५०० मिटर अंतराच्या आतील दारू दुकाने १ एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे आता जिल्ह्यातील ६६४ पैकी ६१६ दारू दुकाने कायमस्वरूपी बंद होणार आहेत़