शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३० ठिकाणी आज चक्काजाम

By admin | Updated: January 31, 2017 00:11 IST

लातूर :मराठा समाज क्रांती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यातील ३० ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

लातूर : मराठा समाजास आरक्षण, महिलांना संरक्षण आणि शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाज क्रांती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यातील ३० ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री शहरातील यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समधील मराठा क्रांती भवनात समाज बांधवांची बैठक झाली. मंगळवारी जिल्ह्यात ३० ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून, यात लातूर शहरातील बसस्थानक, गरुड चौक, ५ नंबर चौक, नवीन रेणापूर नाका, राजीव गांधी चौक या पाच ठिकाणी तर ग्रामीण भागातील चाकूर, औसा-तुळजापूर मोड, रेणापूर तालुक्यातील पिंपळगाव फाटा, लामजना पाटी, निलंग्यातील छत्रपती शिवाजी चौक, अहमदपुरातील छत्रपती शिवाजी चौक, लातूर तालुक्यातील तांदुळजा, कवठा पाटी, हाडगा मोड, हलगरा, औराद शहाजानी, उदगीर, देवणी मोड अशा जवळपास २५ ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परळी-हैदराबाद व लातूर-मुंबई रेल्वेही रोखण्यात येणार आहे.दरम्यान, या आंदोलनासाठी गेल्या आठवडाभरापासून तालुकास्तरावर बैठका घेऊन रुपरेषा सांगण्यात आली. या आंदोलनात समाज बांधवांसह महिला व कुटुंबीयांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या आंदोलनाचा शेतकरी, दूध विक्रेत्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी गावातून बाहेर पडू नये, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील इच्छुकांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरू नये, राजकीय पक्ष व संघटनांनी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये, रुग्णवाहिकेसाठी रस्ता खुला करून द्यावा, असे आवाहन मराठा समाज क्रांती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)