परळी : टोकवाडी फेस्टिव्हलने ग्रामीण भागातील सामाजिक चळवळीचा आदर्श निर्माण केला आहे. अशा फेस्टिव्हलमधून ग्रामीण कलावंतांना व्यासपीठ मिळत आहे, ही कौतुकाची बाब असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केले.टोकवाडी येथे श्री वरद गणेश मंडळाच्या वतीने रविवारी ‘टोकवाडी फेस्टिव्हल’चा उत्साहात प्रारंभ झाला. याप्रसंगी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. मधु जामकर होते. यावेळी प्रसिद्ध पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर, सिने अभिनेते दीपक देउळकर, भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे, सरपंच दशरथ मुंडे यांची उपस्थिती होती.यावेळी निशिगंधा वाड म्हणाल्या, टोकवाडीसारख्या ग्रामीण भागात अतिशय उत्कृष्टरित्या सांस्कृतिक वारसा जोपासला जात आहे. अशा कार्यक्रमांची नितांत गरज असून, यातूनच अनेक कलावंत पुढील काळात सिनेसृष्टीत येऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. जामकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यामध्ये त्यांनी या उपक्रमाला सामाजिक जाणिवांची जोड असल्याचे नमूद केले.तहसीलदार विद्याचरण कडवकर, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण चाटे, डॉ. संतोष मुंडे, गोवर्धन मुंडे, उपसरपंच बालाजी मुंडे, प. स. सदस्य सुग्रीव मुंडे आदी उपस्थित होते. डॉ. राजाराम मुंडे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन माऊली मुंडे यांनी केले, तर आभार संजय मुंडे यांनी मानले. कार्यक्र माला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
‘टोकवाडी फेस्टिव्हलमधून ग्रामीण कलावंत घडावेत’
By admin | Updated: December 25, 2016 23:50 IST