शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेगा’ची दीड कोटींची देयके थकीत

By admin | Updated: August 24, 2014 00:37 IST

कंधार: तालुक्यातील नरेगांतर्गत सिंचन विहिरी, पाणंदरस्ते, रोपवाटिका आदींची कामे २०१२-२०१३ मध्ये करण्यात आली.

कंधार: तालुक्यातील नरेगांतर्गत सिंचन विहिरी, पाणंदरस्ते, रोपवाटिका आदींची कामे २०१२-२०१३ मध्ये करण्यात आली. परंतु कुशलची १ कोटी ५४ लाख ८० हजार २६ रुपयाची देयके प्रलंबित आहेत. आॅगस्ट अखेरपर्यंत ६१ गावात पथकाकडून तांत्रिक तपासणी केल्यानंतर देयके मिळतील, अशी बाब समोर आली आहे.तालुक्यातील नरेगा कामाची सतत वरिष्ठ पातळीवरुन वाखाणणी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात नरेगाची कामे करण्यात कंधार तालुक्याने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. सुरुवातीला नरेगांतर्गत असलेल्या कामाची संख्या सतत वाढत गेली. त्यामुळे सिंचन, रस्ते आदी कामाने गावपातळीवर लक्ष वेधून घेतले आणि कामाचा सपाटा वाढला. काही कामामुळे तक्रारीचा सूर वाढला. त्यामुळे कामाला जशी मरगळ आली. तशीच देयके काढण्याला गतीरोध निर्माण झाला. त्यात चांगली कामे होवूनही कुशलच्या देयकांचा प्रश्न लोंकळला. काही कामात काही त्रुटी असल्याची तरी दर्जा समाधानकारक नसला तरीही सुधारण्याला वाव असतो.कुशल कामाचे देयके मिळविण्यासाठी गत काही महिन्यात तगादा लावण्यात आला . ग्राम पंचायत व संबंधित यंत्रणेने देयके मिळविण्याचा प्रयत्न केला. तरीही हाती काही लागत नव्हते, जिल्हाधिारी यांनी तांत्रिक तपासणीसाठी पथक गठीत केले आहे. पथक आता आंबुलगा, औराळ, बाभूळगाव, बामणी (प.क.), बारुळ, भोजूची वाडी, बोळका, बोरी (खु), चिखलभोसी, दैठणा, चिखली, दाताळा, गुंडा, देवयाचीवाडी, धानोर-कौठा, दही कळंबा, गांधीनगर, गुलाबवाडी, हाडोळी, गोगदरी, हाळदा, हिप्परगा (शहा), जाकापूर, कौठा, जंगमवाडी, कंधारेवाडी, कारतळा, कळका, खुड्याचीवाडी, कुरुळा, लाठ (खु), महालिंगी, मानसिंगवाडी, मरशिवणी, नागलगाव, मसलगा, नंदनवन, नारनाळी, पोखर्णी, नावंद्याचीवाडी, नवघरवाडी, पानभोसी, नवरंगपूरा, फुलवळ, पांगरा, पानशेवडी, पेठवडज, रामानाईकतांडा, राऊतखेडा, संगमवाडी, सावळेश्वर, शेल्लाळी, शिराढोण, शिरसी (खु), शिरुर, तळ्याचीवाडी, उमरज, उस्माननगर आदी ६१ गावात तांत्रिक तपासणी करील. प्रलंबित देयकाने अनेकांची मोठी घालमेल होत होती. जवळपास दीड वर्षापासून मोठी प्रतिक्षा करावी लागली. या महिना अखेर तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण होईल आणि तपासणीत तांत्रिकता सिद्ध झाल्यानंतर देयके मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. (वार्ताहर)