श्रीनिवास भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शेतकºयांकडे शिल्लक असलेली तूर अखेर शासनाकडून ‘बाजार हस्तक्षेप योजने’च्या माध्यमातून खरेदी करण्यात आली़ जिल्ह्यातील विविध केंद्रावर ३१ आॅगस्टपर्यंत २३ हजार १९८़५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, परंतु या तुरीचे चुकारे अद्याप अदा करण्यात आले नाहीत़ त्यामुळे आजघडीला शासनाकडे शेतकºयांचे जवळपास ११ कोटी ७१ लाख रूपये थकले आहेत़नांदेडसह मराठवाडा आणि विदर्भात तुरीच्या उत्पादनात यंदा मोठी वाढ झाली़ त्यामुळे शासनाला तूर खरेदीबाबतचे योग्य नियोजन करता आले नाही़ केंद्र आणि राज्य शासनामार्फत नाफेड, बाजार समितीच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यात आली, परंतु शेतकºयांऐवजी व्यापाºयांची तूर खरेदी होत असल्याचा आरोप झाल्याने अनेकवेळा तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले़ दरम्यान, काही दिवस बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी बंद राहिली़ अशा अडचणी आणि गोंधळात जवळपास सहा टप्प्यांत तूर खरेदी करण्यात आली़केंद्र शासनाच्या आदेशानुसार नाफेडला दिलेल्या १० जूनपर्यंतच्या मुदतीत एकूण १ लाख ५९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावर २० हजार क्विंटलहून अधिक तूर शिल्लक होती़, परंतु खरेदी बंद करण्याबाबत नाफेडला शासनाचे लेखी आदेश प्राप्त झाल्यामुळे नाफेडने तूर खरेदी बंद केली़ त्याचा शेतकºयांना मोठा फटका बसल्याने विविध पक्ष आणि शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला़ त्यानंतर तुरीचे पंचनामे करून शिल्लक तुरीबाबत जिल्हा प्रशासनाकडून शासनाला अहवाल पाठविण्यात आला़ त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदी करण्याचे आश्वासन दिले़ परंतु, महिनाभर यासंदर्भात निर्णय न झाल्याने शेकडो शेतकºयांनी व्यापाºयाला साडेतीन ते चार हजार क्विंटलप्रमाणे तूर विकली़शासन आणि खरेदी यंत्रणा यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने यंदा पाच ते सहा वेळा तूर खरेदी बंद व सुरू करण्यात आली़ ऐन पेरणीच्या तोंडावर तूर खरेदी बंद झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले़ पेरणी करण्यासाठी सावकारांसमोर हात पसरण्याची आणि बेभावाने तूर विकण्याची वेळ शेतकºयांवर आली़केंद्र शासनाने ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल या शासकीय हमीदराने प्रारंभी जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रांवर नाफेडमार्फत २२ एप्रिलपर्यंत १ लाख १२ हजार २९८ क्विंटल तुरीची खरेदी केली़ त्यानंतर टप्याटप्प्याने ६ जूनपर्यंत नाफेडमार्फत एकूण १ लाख ५९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. सदर तूर खरेदी जिल्ह्यातील नांदेडसह अर्धापूर, भोकर, हदगाव, नरंगल व धर्माबाद येथील खरेदी केंद्रावर करण्यात आली़
शासनाकडे थकले ११़७१ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:48 IST