शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लाखो रुपयांचा करमणूक कर थकला

By admin | Updated: September 20, 2014 00:07 IST

परभणी : जिल्ह्यात लाखो रुपयांचा करमणूक कर थकला

परभणी : जिल्ह्यात लाखो रुपयांचा करमणूक कर थकला असून, जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. जुलै २०१३ अखेर या करापोटी केवळ ८६ लाख ४० हजार रुपयांची वसुली प्रशासनाच्या खात्यात जमा झाली आहे.चित्रपटगृह, व्हिडीओगृह, व्हिडीओ गेम पार्लर, केबल, डी. टी. एच. धारकांकडून जिल्हा प्रशासन करमणूक कर वसूल करते. या कराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या महसूलात भर पडते. करमणुकीच्या या साधनांचा वापर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असला तरी त्यापोटी भरला जाणारा कर मात्र नगण्य आहे. २०१३-१४ या वर्षामध्ये जिल्हा प्रशासनाला ३५० लाख रुपयांचे उद्दीष्ट विभागीय आयुक्त कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाने दिले होते. परंतु त्या तुलनेत जुलै २०१३ अखेर केवळ ८६ लाख ४० हजार रुपयांचा कर प्रशासनाच्या खात्यात जमा झाला आहे. उद्दिष्टाच्या प्रमाणात केवळ २४.६९ टक्के कराची वसुली झाली आहे. तर शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या ३६ टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे कर न भरणाऱ्या ग्राहकांची संख्या जिल्ह्यात मोठी असल्याचे लक्षात येते. (प्रतिनिधी)