शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

८२२ शाळांचे एक कोटीवर शुल्क थकित

By admin | Updated: May 18, 2015 00:26 IST

संजय तिपाले, बीड प्रत्येक शाळेत पहिलीच्या वर्गात २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील बालकांना राखीव ठेवायच्या असून, शासन त्यांचे प्रवेशशुल्क भरणार होते

संजय तिपाले, बीडप्रत्येक शाळेत पहिलीच्या वर्गात २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील बालकांना राखीव ठेवायच्या असून, शासन त्यांचे प्रवेशशुल्क भरणार होते. मात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या शाळांच्या तोंडाला शासनाने पाने पुसली आहेत. दोन वर्षांपासून प्रवेशशुल्कापोटी जिल्ह्यातील ८२२ शाळांचे एक कोटी १० लाख रुपये थकित आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २००९ च्या कलम ३५ नुसार २०१२ पासून वंचित व दुर्बल घटकांना लाभ दिला जातो. जि.प. प्राथमिक, अनुदानीत, विनाअनुदानीत शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश दिल्याच्या बदल्यात शासनाकडून शुल्क अदा केले जात नाही.या संस्था शासनच चालवित असल्याने तशी तरतूद नाही. मात्र, कायम विनाअनुदानीत संस्थांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश दिल्याबद्दल शासन प्रतिविद्यार्थी १३ हजार ४०० रुपये किंवा शाळेने निश्चित केलेले शुल्क यापैकी जी रक्कम कमी आहे ती मिळणार होती. २०१२- १३ या शैक्षणिक वर्षात बीड जिल्ह्यात २५ टक्के मोफत प्रवेशाचा लाभ एकाही विद्यार्थ्याला होऊ शकला नव्हता. जि.प. शिक्षण विभागाकडून शासनाला वेळेत माहिती न गेल्याने बालके वंचित राहिली होती. २०१३-१४ मध्ये ३९ तर २०१४-१५ मध्ये ७० कायम विनाअनुदानीत शाळांनी पहिलीच्या वर्गातील एकूण प्रवेशाच्या २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले होते. मात्र, या संस्थांना दोन वर्षांपासून शासनाकडून प्रवेश शुल्काची रक्कम मिळालेले नाही. नव्या शैक्षणिक वर्षाला लवकरच सुरुवात होत आहे;परंतु अद्याप प्रवेशशुल्क न मिळाल्याने २५ टक्के मोफत प्रवेश देण्यास संस्थाही अनुत्सूक आहेत. विशेष म्हणजे काही संस्थांनी शासनाकडून वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्याने मोफत प्रवेश दिलेल्या बालकांच्या पालकांकडून नंतर शुल्क वसूल केल्याच्या तक्रारीही आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अद्याप कुठल्याही संस्थेला याबद्दल साधी विचारणाही केली नाही.मोठा गाजावाजा करत शासनाने आरटीई अ‍ॅक्ट लागू केला. संस्थांनी आरटीईनुसार २५ टक्के बालकांना मोफत प्रवेशाचा लाभही दिला;परंतु शासनाने प्रवेशशुल्क अदा केले नाही. शिक्षणाच्या बाबतीत गांभिर्यपणे विचार करण्याची गरज असून संस्थाचालकांचा अंत पाहू नये, अशी प्रतिक्रिया जिल्हा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दीपक घुमरे यांनी दिली. प्रवेशशुल्क तात्काळ अदा करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.