जिंतूर: शहरातील एलआयसी कार्यालयाजवळ टिप्पर आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.येथील कृष्णा यादवराव श्रृंगारपुतळे हे १४ जुलै रोजी जालना रोडवरील एलआयसी कार्यालया समोरुन जात असताना वाळू घेऊन जाणाऱ्या टिप्परची त्यांच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात कृष्णा शृंगारपुतळे यांचे निधन झाले. अपघाताची माहिती समजताच सचिन गोरे, अॅड. पंडित दराडे, नगरसेवक अनिल घनसावंत, अॅड. गोपाळ रोकडे, प्रताप देशमुख, गुणीरत्न वाकोडे, लक्ष्मण बुधवंत, डॉ. निशांत मुंडे यांच्यासह अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिंतूर येथील स्मशानभूमीत कृष्णा शृंगारपुतळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी माजी आ.कुंडलिक नागरे यांच्यासह सर्वस्तरातील नागरिक उपस्थित होते. कृष्णा श्रृंगारपुतळे हे नगरसेवक चंद्रकांत बहिरट यांचे मामा होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, चार बहिणी, तीन भाऊ असा परिवार आहे. ढगाळ वातावरणपरभणी: मंगळवारी शहर व परिसरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळपासूनच पाऊस येणार अशी स्थिती असताना पावसाने हुलकावणी दिली. नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी)
टिप्पर - दुचाकी अपघातात एक ठार
By admin | Updated: July 16, 2014 00:47 IST