शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही घरातूनच तथागताना वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:05 IST

आज बुद्ध जयंती : भिक्खू संघाचे ऑनलाइन कार्यक्रम औरंगाबाद : कोरोना संकट अजून टळलेले नाही. दया, करुणा, मैत्री बुद्धांच्या ...

आज बुद्ध जयंती : भिक्खू संघाचे ऑनलाइन कार्यक्रम

औरंगाबाद : कोरोना संकट अजून टळलेले नाही. दया, करुणा, मैत्री बुद्धांच्या या शिकवणीप्रमाणे या महामारीत दुसऱ्याची काळजी घेण्यासाठी उपासकांनी बुधवारी २६ मे रोजी सार्वत्रिक कार्यक्रमाचे आयोजन न करता घरातूनच तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी करावी, असे आवाहन भदन्त बोधीपालो महास्थवीर, भदन्त विशुद्धानंदबोधी महास्थवीर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे यांनी केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी उपासक- उपासिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करुन घरातूनच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६५ वी जयंती महोत्सव साजरा करावी. घराघरांवर पंचशील ध्वज फडकावून त्रिशरण, पंचशील, आर्यआष्टांगिक मार्गाचे पठण करावे. घरातील सर्वांनी शुभ्रवस्त्र परिधान करून तथागतांच्या प्रतिमेची पुष्प, दीप, धुपाने पूजा करावी. विहारांमध्ये भिक्खुंनी गर्दी न जमवता पूजा, महापरित्राण पाठ व बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करावे. उद्या, बुधवारी सकाळी ९ वाजता आयोजित केलेल्या भिक्खू संघाच्या ऑनलाई धम्मदेशनेच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असा संदेश भदन्त बोधिपालो महास्थवीर यांनी समाजबांधवांंना दिला आहे.

दुसरीकडे, भदन्त नागसेन, बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे यांनी कळविले की, बुद्धलेणीच्या पायथ्याला विपश्यना सभागृहात सामूहिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम होणार नाही. मोजक्याच भिक्खुंच्या उपस्थितीत पहाटे ५ वाजेपासून ध्यानसाधना, महापरित्राणपाठ तसेच सकाळी ८ वाजता धम्मध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. यावेळी सहायक पोलीस आयुक्त भापकर, सराफ, बेगमपुरा ठाण्याचे प्रभारी सानप यांची उपस्थिती राहील. समता सैनिक दलाच्यावतीने नियमांचे पालन करून मानवंदना दिली जाईल. भंते ज्ञानरक्षीत यांनी कळविले की, धम्ममय भारत मिशन अंतर्गत उद्या पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येकाला धम्ममय भारत मिशन अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

चौकट.....

सार्वजनिक मिरवणुकीला फाटा

दरवर्षी भिक्खू संघाच्यावतीने क्रांती चौक येथून सजविलेल्या रथावर तथागत बुद्धांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून ती भडकलगेटजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ विसर्जित केली जाते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात तथागतांची पूजा करून भिक्खू संघाला भोजनदान देण्याची प्रथा आहे; परंतु कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी आणि यंदाही ही प्रथा स्थगित करण्यात आली आहे.