शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान रखडल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: March 2, 2016 23:18 IST

सितम सोनवणे , लातूर लातूर जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागा अंतर्गत १०७ अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह चालविण्यात येत आहेत़ यातील ९३ योजनेत्तर वसतिगृहाचा तब्बल ६

सितम सोनवणे , लातूरलातूर जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागा अंतर्गत १०७ अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह चालविण्यात येत आहेत़ यातील ९३ योजनेत्तर वसतिगृहाचा तब्बल ६ महिन्याचा निधी मिळाला नसल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था उधारी- उसणवारीवर करण्यात येत आहे़परिणामी वसतिगृह आणि कर्मचाऱ्याचे हाल होत असून कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़लातूर जिल्ह्यातील १०७ अनुदानित मागसवर्गीय वसतिगृह सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालविण्यात येत आहे़ यातील १२ वसतिगृह योजने अंतर्गत आहेत़ तर दोन वसतिगृह विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी आहेत़ या १४ वसतिगृहाला नियमित निधी दिला जातो़ पण योजनेत्तर ९३ वसतिगृहाला आॅगस्ट पर्यंतचे अनुदान प्राप्त झाले होते़ पण आॅगस्ट २०१५ नंतर तब्बल सहा महिन्यापासून शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाही़ त्यामुळे वसतिगृहाचे इमारत भाडे, विद्यार्थ्याचे भोजन अनुदान आणि कर्मचाऱ्याचे मानधन असे एकूण कोट्यवधी रुपयाचे अनुदान थकले आहे़ विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी व्यवस्थापकांना उसणवारी करावी लागत आहे़ त्यातच जिल्ह्यात आसलेली तीव्र पाणी टंचाई मुळे अनेक वसतिगृहासाठी पाणी टँकरच्या माध्यमातून विकत घ्यावे लागत आहे़ सहामहिन्याचे अनुदान थकल्यामुळे या वसतिगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे़ सुरवातीच्या काळात शेजारी- आप्त नातवाईकांनी आर्थिक मदत केली़ पण तिसऱ्या महिन्यापासून सर्वानी मदतीचा हात आखडला़ दुष्काळी परिस्थितीमुळे ज्यांनी मदत केली त्यांनी दिलेली मदतीची परत मागणी केली आहे़ भाड्यानी असलेल्या वसतिगृह व्यवस्थापकांना मालकांचा भाड्यासाठी तगादा सुरू आहे़ अशा तणावग्रस्त परिस्थितीत व्यवस्थापक आणि कर्मचारी आहेत़