शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नहर-ए-अंबरी याचिकेत १६ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:22 IST

नहर-ए-अंबरी व नहर-ए-पाणचक्कीबाबत ‘अवमान याचिके’च्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. विभा कंकणवाडी यांनी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी दाखल करून घेतलेल्या ‘सुमोटो याचिकेत’ महापालिका व राज्य शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नहर-ए-अंबरी व नहर-ए-पाणचक्कीबाबत ‘अवमान याचिके’च्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. विभा कंकणवाडी यांनी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी दाखल करून घेतलेल्या ‘सुमोटो याचिकेत’ महापालिका व राज्य शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. उपरोक्तप्रकरणी माहिती सादर करण्यासाठी खंडपीठाने प्रतिवादींना १६ नाव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.शहरातील नहर-ए-अंबरी आणि नहर-ए-पाणचक्की या दोन्ही नहरी या पुरातत्वीय वारसा आहेत. त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे मुद्दे याचिकेत मांडण्यात आले आहेत. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने स्वत:हून त्यांची दखल घेत ‘सुमोटो याचिका’ दाखल करून घेतली आहे. दोन्ही नहरींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासंदर्भात योजना आखण्याचे निर्देशही खंडपीठाने यापूर्वी दिले आहेत.गुरुवारी (९ नोव्हेंबर) याचिका सुनावणीस निघाली असता केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय देशपांडे यांनी बेगमपुरा येथील थत्ते हौदासंबंधी माहिती दिली. उपरोक्त परिसर वारसा स्थळ यादीत टाकण्यासाठी लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. स्थानिक नागरिकांनीही त्यास विरोध दर्शविला आहे. सदर स्थळ एकदा वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केल्यास संबंधित वास्तूच्या शंभर मीटर परिसरात कुठल्याही प्रकारचे बांधकाम करता येत नसल्याचे त्यांनी खंडपीठात स्पष्ट केले. अवमान याचिकेच्या अनुषंगाने मनपा आयुक्तांऐवजी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी खंडपीठात शपथपत्र दाखल केल्याचे अ‍ॅड. दक्षिणी यांनी यापूर्वीच्या सुनावणीत खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले होते. कंत्राटदाराला नहर तोडण्याची परवानगी दिली नसल्याचे मनपा आयुक्तांनी निवेदन केले होते, तर कंत्राटदाराला नहर तोडण्याची परवानगी दिली असल्याचे पानझडे यांनी शपथपत्रात म्हटले आहे. नहर-ए-पाणचक्की ही वक्फची मालमत्ता असल्याचेही त्यांनी शपथपत्रात म्हटल्याचे निदर्शनास आणून दिले होते. सुमोटो याचिकेत न्यायालयाचे मित्र म्हणून अ‍ॅड. प्रदीप देशमुख काम पाहत आहेत. महापालिकेची बाजू अंजली दुबे-वाजपेयी यांनी मांडली.