संतोष हिरेमठ , औरंगाबादआपल्या जीवाची पर्वा न करता बसमधील तब्बल ४५ प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या चालकाला एसटी महामंडळाने ‘बाजीगर’चे प्रमाणपत्र दिले. प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या नवनाथ बोडखे यांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. त्याला महामंडळाने आज भंगारात जमा केले आहे. मागील तीन वर्षांपासून हा बाजीगर आपल्या न्याय्य हक्कांसाठी महामंडळाचे उंबरठे झिजवत आहे.२४ जून २०११ रोजीचा तो दिवस. पुण्याहून औरंगाबादकडे निघालेली एसटी महामंडळाची बस अहमदनगरजवळ आली. याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरचे टायर फुटले आणि दुभाजक तोडून कंटेनर सरळ बसच्या दिशेने आला; परंतु यावेळी एसटीचालकाने समयसूचकता दाखवीत बस डाव्या बाजूने वळविली. यानंतरही कंटेनरचा काही भाग चालकाच्या बाजूने धडकला. याच वेळी बसच्या पाठीमागून आलेल्या कारने कंटेनरला धडक देत पेट घेतला. बसशेजारील दोन्ही वाहने जवळ होती. आगीच्या झळा बसपर्यंत पोहोचत होत्या. अशा परिस्थितीत पाय फॅ्रक्चर झालेला असतानाही एसटी बसचालकाने रस्त्याच्या कडेला बस सुरक्षित ठिकाणी उभी केली. यामुळे मोठा अपघात टळला. या धैर्यासाठी महामंडळाने चालकाच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली. या गंभीर अपघातात चालकाचा पाय फ्रॅक्चर झाला. गुडघ्याच्या वाटीचे तुकडे झाले. उपचारानंतर एका पायास अपंगत्वही आले. नवनाथ सूर्यभान बोडखे, असे बाजीगर चालकाचे नाव आहे. एका भयानक अपघाताने बोडखे यांचे आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकले. औषधोपचार कालावधीतील रजा मंजूर होत नसल्याने बोडखे महामंडळाचे उंबरठे झिजवीत आहेत.शिपाईपदी नियुक्ती अपघातात पायास अपंगत्व आल्याने नवनाथ बोडखे यांनी चालकाऐवजी दुसरे काम मिळावे म्हणून महामंडळाकडे अर्ज केला. त्यानुसार त्यांना २७ नोव्हेंबर २०१३ पासून आगार क्रमांक-२ येथे शिपाईपदी नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून शिपाईपदाचे वेतन त्यांना नियमितपणे मिळत आहे.रजा मंजूर होण्याची प्रतीक्षागंभीर जखमी झाल्याने औषधोपचारासाठी घेतलेल्या २४ जून २०११ ते २६ नोव्हेंबर २०१३ यादरम्यान घेतलेली रजा मंजूर करून वेतन देण्याची मागणी नवनाथ बोडखे यांनी केली आहे; परंतु अद्यापही त्याची पूर्तता होत नसल्याचे दिसत आहे. उपचाराचा खर्च महामंडळाने केला. श्रमिक नुकसानभरपाई म्हणून १,८०० रुपये मिळाले. घरातील कर्ता पुरुषआई-वडील, दोन मुले व पत्नी, असा परिवार असलेला नवनाथ बोडखे हे घरातील एकमेव कर्ता पुरुष. त्यांच्या नोकरीच्या वेतनाशिवाय उत्पन्नाचे कोणतेही इतर साधन नाही. अपघातानंतर उपचाराचा खर्च महामंडळाने केला. मात्र, २७ महिन्यांच्या कालावधीत घरखर्च आणि मुलांचे शिक्षण, आजारपण यासाठी कर्ज घेण्याची वेळ बोडखे कुटुंबियांवर आली.जीव वाचविल्याचे समाधानतीन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात प्रवाशांचे जीव वाचविल्याचे आजही समाधान आहे. या घटनेची दखल घेऊन प्रशस्तीपत्र देऊन गौरवही करण्यात आला; परंतु औषधोपचाराच्या कालावधीतील रजा मंजूर होत नाही. त्यामुळे या कालावधीतील वेतन मिळत नाही. त्यासाठी महामंडळाकडे अर्जही केल्याचे नवनाथ बोडखे यांनी सांगितले.माहिती घेण्यात येईलया प्रकरणाची माहिती घेतली जाईल आणि संपूर्ण चौकशी केली जाईल, असे विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी सांगितले.
बाजीगर चालकावर आली याचिकेची वेळ
By admin | Updated: June 24, 2014 01:07 IST