शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत शिक्षकांवर आंदोलनाची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:58 IST

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने आज शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देप्रश्न सुटेना : शिक्षक भारतीच्या धरणे आंदोलनाला प्रतिसाद; जोरदार घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने आज शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.सायंकाळी काँग्रेसचे आ. सुभाष झांबड यांनी आंदोलनस्थळी जाऊन अधिकारी- पदाधिकाºयांना बोलावून घेतले. त्यावेळी शिक्षणाधिकारी गजानन सुसर, जि. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती धनराज बेडवाल, काँग्रेसचे पैठण तालुकाध्यक्ष विनोद तांबे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणाधिकाºयांनी स्थायित्वाचे ६१३ प्रस्ताव प्रातिनिधिक स्वरुपात निकाली काढले व ते शिक्षक भारतीच्या पदाधिकाºयांकडे सुपूर्द केले.वेतनप्रणाली आॅनलाईन असो की आॅफलाईन, शिक्षकांचा पगार हा कधीच १० तारखेच्या आत झालेला नाही. विमा, बँक, रेल्वे विभागात एक तारखेलाच पगार होतो. जि.प.लाच नेमकी कोणती अडचण आहे. केंद्रप्रमुखांची ७५ पदे रिक्त असताना पदोन्नती प्रक्रिया राबविली जात नाही. शालेय पोषण आहाराची देयके रखडली जातात. निमशिक्षक, अंशदायी पेन्शन इत्यादी प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.जि. प. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक हे या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, अनिल देशमुख, महेंद्र बारवाल, संतोष ताठे, राजेश भुसारी, किशोर कदम, मुश्ताक शेख, मच्छिंद्र भराडे, मच्छिंद्र शिंदे, रमेश जाधव, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, ऊर्मिला राजपूत, स्वाती गवई, सुप्रिया सोसे, संजय बुचुडे, विजय ढाकरे, गणेश तोटावाड, दत्ता गायकवाड, रामदास कवठेकर, गोविंद उगले, संजय देव्हरे, अमरसिंग चंदेल, प्रवीण संसारे आदींसह शिक्षकांनी परिश्रम घेतले.आ. सुभाष झांबड यांची भेटजिल्हा या आंदोलनाच्या वेळी आ. सुभाष झांबड यांनी भेट दिली. ते म्हणाले की, शिक्षकांच्या लहान-सहान प्रश्नांसाठी शिक्षकांवर आंदोलनाची वेळ यावी, ही दुर्दैवी बाब आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न समजून घेण्यात आमचे पदाधिकारी कमी पडले असावेत. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्या. येत्या आठ दिवसांत प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत तर विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.शिक्षक परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणेमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू शिक्षक व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, याबाबत शिक्षक परिषदेने अनेकवेळा शासनाला निवेदने सादर केली. या प्रश्नावर आंदोलनेही केली; परंतु याबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. याशिवाय शिक्षक-कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत दिरंगाई होत आहे. यासंदर्भात आंदोलन करण्याचा ठराव राज्य कार्यकारिणीने घेतला होता.त्यानुसार आज शनिवारी शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले. निवेदनात नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्र सरकारप्रमाणे राज्यानेही सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा, या मागण्यांचा समावेश करण्यात आला. या धरणे आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस सुधाकर म्हस्के, सुरेश पठाडे, बाबूराव गाडेकर, प्रभुलाल झलवार, श्रीराम बोचरे, दिलीप गोरे, प्रकाश लोखंडे, दिलीप कुंदे, जिजा उकर्डे, जगन ढोके, लता पठाडे, रेखा शिंदे, शीतल शेळके, संगीता बोरसे, आशा वैष्णव, सुशीला पवार, किरण गाडेकर, प्रकाश बोंबले, शिवाजी दांडगे, लक्ष्मण भोसले, संजय शेळके, दीपक नरवडे, अर्जुन दांडगे आदींनी परिश्रम घेतले.