शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत चौघांना फाशीची शिक्षा

By admin | Updated: August 19, 2016 01:02 IST

शिरीष शिंदे , बीड कु्रर पद्धतीने खून करणाऱ्या घटनांचे गांभीर्य ओळखत न्यायालय न्यायदान करताना जराही संकोच न बाळगता आरोपींना फाशीची शिक्षा सुनावतात हे सर्वश्रूत आहे

शिरीष शिंदे , बीडकु्रर पद्धतीने खून करणाऱ्या घटनांचे गांभीर्य ओळखत न्यायालय न्यायदान करताना जराही संकोच न बाळगता आरोपींना फाशीची शिक्षा सुनावतात हे सर्वश्रूत आहे. यामुळे पीडितांच्या कुटुंबियांना न्याय तर गैरकृत्य करणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होते. आतापर्यंत जिल्ह्यात तीन प्रकरणांमध्ये चार आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, तिन्ही घटना महिलांवरील अत्याचाराच्या आहेत. महिला, मुलीवर अत्याचार होण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. दिल्ली येथे निर्भया खून प्रकरण हे अतिशय कु्रर पद्धतीचे होते. त्यामुळे त्यातील सातही आरोपींना उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. कु्रर पद्धतीने खून करणाऱ्यांना शेवटी फाशीच झाली यावर गुरुवारी सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.जिल्ह्यातील फाशीचे पहिले प्रकरणजिल्हा न्यायालय जवळपास १९६० साली सुरु झाले. तालुक्यातील पाली येथे १९९० मध्ये एका तरूणाने पत्नीस चारित्र्याच्या संशयावरून क्रुर पद्धतीने खून करुन प्रेत पाली धरणात पोत्यात भरून फेकून दिले होते. तत्कालिन जिल्हा सरकारी वकील भाऊसाहेब जगताप यांनी बाजू मांडली. जिल्हा व सत्र न्यायालयाने पहिल्यांदा आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली होती. दुसरी घटना गेवराई शहरातील २००८ मध्ये सुनील दामोधर गायकवाड याने पत्नी संगीताच्या चारित्र्यावर संशय घेत कात्रीने ३५, तर मुलगा आकाश व मुलीच्या अंगावर २५ वार केले होते. सुदैवाने पूजा बचावली. तत्कालिन सरकारी वकील उपेंद्र करमाळकरांनी सादर केलेल्या पुराव्यावरुन तत्कालीन न्या. नितीन दळवी यांनी सुनीलला सरकारी फाशी सुनावली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.चोरंबा येथे अल्पवयीन मुलीचा व तिच्या आईचा खून झाला होता्र माजलगाव सत्र न्यायालयाचे न्या. एम.व्ही. मोराळे यांनी आरोपी कृष्णा रिड्डे व अच्युत चुंचे यांना बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. सरकारी वकील अजय तांदळे यांनी अत्यंत जबाबदारीने हे प्रकरण हाताळले होते. संवेदनशील प्रकरणामुळे निकालाच्या काही दिवसाआधी त्यांना संरक्षण दिले गेले. उपअधीक्षक गणेश गावडे यांनी केलेला तपास व सरकारी वकील तांदळे यांनी मांडलेली भक्कम बाजू यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा झाली.