शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

टिळकपथ ५0 चा नव्हे, उरला फक्त २४ फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:25 IST

कोट्यवधी रुपये खर्चून महानगरपालिकेने शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले. रुंदीकरणानंतर शहरातील प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची रुंदी वाढलेली असल्याचे मनपाच्या दप्तरी नोंद झाली. मात्र कागदोपत्री असलेली नोंद आणि प्रत्यक्षातील रस्ता यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचा अनुभव रोज वाहनचालकांना येतो. ही बाब लक्षात घेऊन लोकमतने चला रस्ता मोजूया हा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षाचे परिणाम : फेरीवाले, हातगाड्या आणि वाहनांचे रस्त्यावर राजरोस अतिक्रमण

मुजीब देवणीकर/बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोट्यवधी रुपये खर्चून महानगरपालिकेने शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले. रुंदीकरणानंतर शहरातील प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची रुंदी वाढलेली असल्याचे मनपाच्या दप्तरी नोंद झाली. मात्र कागदोपत्री असलेली नोंद आणि प्रत्यक्षातील रस्ता यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचा अनुभव रोज वाहनचालकांना येतो. ही बाब लक्षात घेऊन लोकमतने चला रस्ता मोजूया हा उपक्रम हाती घेतला आहे. शहराची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया टिळकपथक ते गुलमंडी या रस्त्याची लोकमतने विविध तीन ठिकाणी मोजणी केली असता फेरीवाले, हातगाडीचालक आणि वाहन पार्किंगमुळे ५० फू ट रुंदीचा हा रस्ता प्रत्यक्ष वापरासाठी केवळ काही ठिकाणी १५ फूट तर काही ठिकाणी २४ फूट उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब समोर आली.पैठणगेट ते गुलमंडी या रस्त्याला टिळकपथ असे नाव आहे. तेथील कपडा मार्केटमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते. दिवाळी आणि ईदमध्ये तर या रस्त्याला जत्रेचे स्वरूप येते आणि पोलिसांना हा रस्ता वाहनांच्या रहदारीसाठी बंद करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण केले. रुंदीकरणानंतर या रस्त्याची रुंदी ५० फूट असल्याची नोंद मनपाच्या दप्तरी आहे. टिळकपथवरील दोन्ही बाजूच्या इमारतींचा वापर व्यावसायिक आहे. असे असताना टिळकपथवर खरेदीसाठी येणाºया ग्राहकांची वाहने पार्किंग करण्यासाठी एकाही व्यापाºयांनी पार्किंगची जागा सोडलेली नाही. परिणामी वाहनचालकांना रस्त्यावरच वाहने उभी करण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय व्यापारी आणि त्यांचे कर्मचारीही दुकानासमोर वाहने (पान २ वर)रस्ता केला वन-वे...५० फूट रुंदीच्या टिळकपथवर दुहेरी वाहतूक होणे अपेक्षित आहे. मात्र, वाहनांच्या पार्किंग आणि रस्त्यावरील हातगाड्यांमुळे रहदारीसाठी रस्ता अत्यल्प राहिला. परिणामी तेथे होणारी सततची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा रस्ता वन- वे (एकेरी) केला. शिवाय रस्त्यावरील पार्किंगसाठीही सम आणि विषम दिवस ठरवून दिले.४ कोटींचा गुळगुळीत रस्तापैठणगेट ते गुलमंडी आणि महात्मा फुले पुतळ्यापर्यंतचा रोड महापालिकेने गुळगुळीत केला. या रस्त्याच्या कामावर महापालिकेने तब्बल चार कोटी रुपये खर्च केले. हे काम करताना कंत्राटदाराने फुटपाथाचे कामच केले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजंूनी व्यापाºयांनी अत्यंत तत्परतेने पाच, दहा फूट अतिक्रमणे केली आहेत.चलारस्ता मोजूया!लोकमतच्या प्रतिनिधींनी पैठणगेट ते मॅचवेल या दुकानांपर्यंत टिळकपथची तीन ठिकाणी रुंदी बुधवारी सायंकाळी टेप लावून मोजली. पैठणगेट येथे रस्ता २४ फूट तर पुढे काही अंतरावर केवळ ८ फूट तर बाराभाई ताजिया भागातही २५ फूट रुंदीचा रस्ता रहदारीसाठी मोकळा असल्याचे दिसून आले.