शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु- मिश्रा

By admin | Updated: September 13, 2014 23:28 IST

भोकरदन: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदार संघात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी

भोकरदन: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदार संघात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उल्लघंन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भोकरदन मतदार संघासाठी २० सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. २७ सप्टेंबरला नामाकंन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून २९ रोजी छाननी व १ आॅक्टोंबर रोजी उमेवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याचप्रमाणे १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून १९ अॉक्टोबर रोजी शासकिय विश्रामगृहासमोरील नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात मतमोजणी होईल. त्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. या मतदार संघात २ लाख ६४ हजार ११९ मतदार आहेत. यात पुरूष १ लाख ४० हजार ९२३ तर महिला १ लाख २३ हजार १९५ मतदार आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीपेक्षा यंदा ६ हजार मतदार वाढले आहेत. ज्या मतदारांचे नाव अद्याप यादीत नसेल किंवा काही नावात बदल झाला असेल अशा मतदारांसाठी १४ सप्टेंबर रोजी बी.एल.ओ.कडे नावाची नोंद करता येणार आहे. या मतदारांना सुध्दा या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार असल्याचे मिश्रा यांनी सागिंतले़ या मतदार संघात भोकरदन तालुक्यातील पाच महसूली मंडळाचा समावेश असून जाफ्राबाद तालुुक्यातील पाच महसूली मंडळातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे. या मतदार संघात ३०० मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी १३ पथकाची स्थापना करण्यात आली. निवडणूक काळात कोठेही गरबड होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. आचासंहिता सुरू झाल्या पासुन गावा गावात सर्व पक्षाचे लावण्यात आलेले उदघाटनाचे फलक, बॅनर, तात्काळ काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी भोकरदनच्या तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी रूपा चित्रक, जाफ्राबादचे तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार आऱजे़डोळे, एस़जी़ डोळस हे उपस्थित होते़आ. चंद्रकांत दानवे यांच्या कार्यालयात शासकीय योजनांचे अर्ज वाटप केले जात असल्याची तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर पक्षाचे चिन्ह व पैशाचे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या. मिश्रा यांनी दोन्ही ठिकाणचे चित्रिकरण करून प्रकरण आचारसंहिता कक्षाकडे वर्ग केल्या आहेत. (वार्ताहर)मतदार संघात ३०० मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी १३ पथकाची स्थापना करण्यात आली. निवडणूक काळात कोठेही गडबड होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. या मतदार संघात २ लाख ६४ हजार ११९ मतदार आहेत. यात पुरूष १ लाख ४० हजार ९२३ तर महिला १ लाख २३ हजार १९५ मतदार आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीपेक्षा यंदा ६ हजार मतदार वाढले आहेत. ज्या मतदारांचे नाव अद्याप यादीत नसेल किंवा काही नावात बदल झाला असेल अशा मतदारांसाठी १४ सप्टेंबर रोजी बी.एल.ओ.कडे नावाची नोंद करता येणार आहे. मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मिश्रा यांनी यावेळी केले.