शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

प्राणिसंग्रहालयात जन्मले वाघांचे बछडे

By admin | Updated: August 27, 2014 00:16 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पांढऱ्या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पांढऱ्या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. महिनाभरापूर्वीच पिलांचा जन्म झाला असून, त्या पिलांनी आजवर डोळे उघडलेले नाहीत.त्यांना संंग्रहालयातील अतीव दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पिलांची काळजी घेतली जात असून कुणालाही तिथपर्यंत जाऊ दिले जात नाही. असे सूत्रांनी सांगितले. वाघिणीने तीन पिलांना जन्म दिला होता. मात्र, एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच मनपाने वाघाच्या पिलांच्या जन्माची बातमी बाहेर येऊ दिली नसल्याचा संशय येतो आहे.मे महिन्यात ३ पिवळ्या वाघाच्या पिलांचा जन्म झाला होता. ती माहितीही संग्रहालयाने दडवून ठेवली होती. पिलांना संसर्ग होऊ नये. यासाठी ती माहिती दडवून ठेवली होती असे सूत्रांनी सांगितले. तीन महिन्यांत उद्यानामध्ये ५ वाघांच्या पिलांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये तीन पिवळ्या व दोन पांढऱ्या वाघांचा समावेश आहे.संग्रहालयातील प्राणिसंपदा सध्या संग्रहालयात पिवळे वाघ ५, पांढरे वाघ ४, बिबट्या मादी १, हत्ती २, अस्वल २, नीलगायी ८, सांबर ३५, काळवीट ४२, चितळ २, तडस ३, लांडगा १, सायाळ ४, उदबिल्ला ५, इमू २, पाणपक्षी २८, माकड ३, मगर ९, चांदणी कासव ४९, पाण्यातील कासव ५ व विविध जातींचे ८८ सर्प अशी प्राणीसंपदा आहे, अशी माहिती उद्यानाच्या सूत्रांनी दिली.एका पिलाचा मृत्यू?प्राणिसंग्रहालयात पिले केव्हा जन्मली, त्यांची संख्या किती होती. यावर कुणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही. दरम्यान, तीन पिलांना वाघिणीने जन्म दिला होता. परंतु त्यातील एका पिलाचा मृत्यू झाल्याची चर्चा होती.मात्र, त्याप्रकरणी कुणीही बोलण्यास तयार नाही. मंगळवारी उद्यान बंद असते, तसेच प्राणिसंग्रहालय अधीक्षक डॉ.बी.एच.नाईकवाडे हे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे याप्रकरणी कुणीही माहिती देण्यास पुढे आले नाही. गेल्यावर्षी एका पिलाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला होता.