शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाघ रंग बदलत नाही-धोंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:19 IST

स्वयंघोषित मन्याडचा वाघ जर सेनेतच असल्याचे सांगत आहे़ तर त्यांनी माझ्या स्वागतासाठी यायला पाहिजे होते़ कारण वाघ हा रंग बदलत नाही़ सरडा मात्र रंग बदलतो, अशा शब्दात आ़ प्रताप पाटील चिखलीकरांवर टीकास्त्र सोडत भाजपामध्ये मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे यांनी केला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: स्वयंघोषित मन्याडचा वाघ जर सेनेतच असल्याचे सांगत आहे़ तर त्यांनी माझ्या स्वागतासाठी यायला पाहिजे होते़ कारण वाघ हा रंग बदलत नाही़ सरडा मात्र रंग बदलतो, अशा शब्दात आ़ प्रताप पाटील चिखलीकरांवर टीकास्त्र सोडत भाजपामध्ये मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे यांनी केला़अ‍ॅड़मुक्तेश्वर धोंडगे यांनी भाजपाला जय श्रीराम करीत, मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले होते़ त्यानंतर शनिवारी सकाळी देवगिरीने ते नांदेडात दाखल झाल्यानंतर दुचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले़ त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत अ‍ॅड़धोंडगे म्हणाले, दिवगंत गोपीनाथ मुंडे यांच्या भेटीनंतर मी राजकारणात आलो़ विधानसभेला तयारीसाठी केवळ १३ दिवस मिळाले़ भाजपाची सत्ता आल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले़मराठा, मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत भाजपाची भूमिका दुटप्पी आहे़ स्वतंत्र विदर्भाच्या भाजपच्या मुद्यालाही माझा विरोध आहे़ कारण भाई केशवराव धोंडगे यांनीही संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा लाऊन धरला होता़ त्यांनी १५ आॅगस्टला सत्याग्रहाची घोषणा केली होती़, परंतु आंदोलनापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले़ आमच्याच पक्षात अशाप्रकारची वागणूक मिळत असेल तर काय अर्थ आहे़ त्यामुळे कोणतीही अट न ठेवता मी सेनेत जाण्याचा निर्णय घेतला़ गणेशोत्सवानंतर कंधार येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़ चिखलीकर यांना मातोश्रीवरुन निमंत्रण आल्याचे काही जण सांगत आहेत, परंतु मातोश्रीवरुन आजपर्यंत असे कुणाला निमंत्रण गेले असेल मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी चिखलीकरांना लगावला़ यावेळी आ़ हेमंत पाटील यांनी आगामी मनपा निवडणुकीत सेना युतीसाठी तयार आहे़, परंतु भाजपाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले़ यावेळी धोंडू पाटील, प्रकाश कौडगे, भुजंग पाटील, प्रकाश मारावार यांची उपस्थिती होती़