कळंब : शहरात रविवारी दुपारी शिवसेनेच्या दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत सहाजण जखमी झाले़ यातील एका गंभीर जखमीस पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बाबा नगर भागातील सेनेचे शहरप्रमुख पांडुरंग कुंभार यांच्या घरासमोर काही कार्यकर्ते फटाके फोडत होते़ याबाबत विचारणा केली असता दोन गटांत शाब्दीक बचाबाची झाली त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले़ या हाणामारीत शहरप्रमुख पांडुरंग कुंभार, पंस सदस्य हरिभाऊ कुंभार, संतोष कुंभार, सनी मस्के, दुसऱ्या गटातील अमजद मुल्ला, वसीम शेख हे जखमी झाले आहेत़ गंभीर जखमी संतोष कुंभार यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात पाठविण्यात आले आहे़ दरम्यान, घटनेनंतर शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़ अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे यांनी घटनेची माहिती मिळताच कळंब शहरात धाव घेवून पाहणी केली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ (वार्ताहर)
कळंबमध्ये शिवसेनेच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी
By admin | Updated: October 20, 2014 00:32 IST