शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

भोकरमध्ये वादळाचे थैमान

By admin | Updated: June 24, 2017 00:16 IST

भोकर : शहरासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : शहरासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले़ यात शहरातील एका घराची भिंत पडून एक जखमी झाला तर शेकडो घरावरची पत्रे उडाल्याच्या घटनेने जनजीवन भयभीत झाले होते.दिवसभराच्या उकाड्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अचानक वादळाने थैमान घातले़ यात जोराचा पाऊसही झाला. वादळाची तीव्रता एवढी भयंकर होती क, यात अनेक झाडे मुळासकट उखडलील तर काही घरांची पडझड झाली. यात शहरातील प्रफुल्लनगर येथे घराचे बांधकाम सुरु असलेली भिंत कोसळून गणपत माधव मुनेश्वर (वय ३२, शिक्षक भुजंगराव मा. विद्यालय रिठ्ठा) जखमी झाले. भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. पोहरे यांनी प्राथमिक उपचार करुन नांदेडला हलविले. वादळी वाऱ्याने भोकर ते उमरी मार्गावर सागवान फाटा येथे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. विद्युत खांबे पडल्याने तारा तुटून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. शहरातील गांधीनगर, शास्त्रीनगर, समतानगर, शनीदेव मंदिर परिसरातही शेकडो घरांवरचे पत्रे उडाले. यात समतानगर येथे प्रकाश पोचिराम वाघमारे यांचे टिनाचे पूर्ण घरच कोसळले. घरातील सर्व जण पलंगाखाली दडल्याने बालंबाल बचावले. बिलालनगर रस्त्यावरील झाड कोसळून विद्युत तारा तुटून पडल्या. तर कित्येक घराच्या भिंती कोसळल्या. १५ मिनिट वादळी वाऱ्याने थैमान घातल्याने जनजीवन भयभीत झाले होते.