शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सोयगावात पिसाळलेल्या कुत्र्यांचा थैमान; आठ बालकांचे लचके तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:12 IST

तालुक्यातील जरंडी येथे अंगणात ब्रश करत उभे असलेल्या बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत आठ बालकांचे लचके तोडल्याची घटना आज सकाळी घडली. 

सोयगाव (औरंगाबाद ) : तालुक्यातील जरंडी येथे अंगणात ब्रश करत उभे असलेल्या बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत आठ बालकांचे लचके तोडल्याची घटना आज सकाळी घडली. 

जरंडी गावात पहाटेपासून पिसाळलेल्या कुत्र्यांचा संचार होता. सकाळी अंगणात उभा राहून ब्रश करणाऱ्या बालकांकडे या कुत्र्यांनी मोर्चा वळवत त्यांच्यावर हल्ला केला. आठ बालकांचे लचके तोडत त्यांना गंभीर जखमी केले. याच दरम्यान, गोठानपुरा येथेही एका बालकाला कुत्र्यांच्या कळपांनी चारही बाजूंनी घेरले होते. हल्ला चढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुत्र्यांच्या कळपांवर ग्रामस्थ वेळीच तुटून पडले आणि बालकाची सुखरूप सुटका झाली. दरम्यान, जखमी बालकांना तातडीने पाचोरा व जळगाव येथे तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यासोबतच यादव नामदेव पाटील ( ५२) या शेतकऱ्यावरसुद्धा  कुत्र्यांनी हल्ला चढवला. त्यांच्या पायाची रक्तवाहिन्या कुत्र्यांनी तोडल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने जळगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पिसाळलेली कुत्री जळगावातून आले जळगाव जिल्ह्यातून वाहनाद्वारे कुत्र्यांच्या कळपांना जरंडीला आणून सोडले आहे. यामुळे आठवडाभरापासून गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी थैमान घातले आहे. आज सकाळपासून गावात शुकशुकाट पसरला होता. 

सोयगावातही मोकाट कुत्रे सोयगाव शहरातही मोकाट कुत्र्यांची संख्या आहे. बसस्थानक परिसरात या कुत्र्यांनी बस्तान बसविले आहे. मुख्य रस्त्यावर या कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

रेबीजच्या लसीचा तुटवडामोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मात्र रेबीज लस उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांना उपचारासाठी पाचोरा, जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टॅग्स :dogकुत्राhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं