शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खोडसाळपणाने ‘एटीएम’वर घातले दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:54 IST

गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातील समर्थनगर येथील दोन वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मशीनवर एक जणाने दगड घातले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एखाद्याच्या मनात आले की, कोण काय करील, हे सांगता येत नाही. अशाच एका घटनेत गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातील समर्थनगर येथील दोन वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मशीनवर एक जणाने दगड घातले. यात दोन्ही मशीनच्या स्क्रीन फुटल्याने त्यांचे कामकाज ठप्प झाले.याविषयी अधिक माहिती देताना क्र ांतीचौक ठाण्याचे निरीक्षक अनिल आढे म्हणाले की, समर्थनगर येथील मुख्य रस्त्यावर विविध बँकांचे एटीएम सेंटर आहेत. गुरुवारी रात्री साडेबारा ते १ वाजेच्या सुमारास भारतीय स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर एक जणाने हल्लाबोल केला. समर्थनगर परिसरात राहणाºया गोमटे नावाच्या सुमारे ५५ वर्षीय व्यक्तीने रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एटीएम सेंटरवर चक्कर मारली. यानंतर रात्री १ वाजेच्या सुमारास पुन्हा तेथे गेला आणि एटीएम मशीनवर त्याने भलामोठा दगड घातला. या घटनेत एटीएमची स्क्रीन खराब झाली आणि घटनेपासून एटीएमचे कामकाज ठप्प झाले.विशेष म्हणजे तो रस्त्यावरून दगड घेऊन एटीएम सेंटरमध्ये गेल्याचे तेथील सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. तत्पूर्वी १२.३० वाजेच्या सुमारास याच गोमटे नावाच्या व्यक्तीने भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या एटीएम सेंटरवर धाव घेतली. प्रथम त्याने सीडीएमवर (पैसे जमा करण्याचे मशीन) वीट मारली. मात्र, या मशीनची स्क्रीन मजबूत असल्याने स्क्रीनला काहीच झाले नाही. यामुळे त्याने दुसरी वीट शेजारी असलेल्या एटीएम मशीनवर घातली. यात मात्र मशीनचे नुकसान झाले. त्याचे हे कृत्यही सीसीटीव्हीत कैद झाले. बँक व्यवस्थापक संतोष वर्तक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.