शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेचे विवरणपत्र देण्यावरून थरकाप

By admin | Updated: January 12, 2016 00:05 IST

औरंगाबाद : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी आपल्या मालमत्तेचे विवरणपत्र द्यावे लागते. महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी

औरंगाबाद : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी आपल्या मालमत्तेचे विवरणपत्र द्यावे लागते. महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी या नियमाला दरवर्षी फाटा देत असत. प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मालमत्तेचे विवरणपत्र न देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पाचशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार या महिन्यात होणार नाहीत. यातील बहुतांश अधिकारी तांत्रिक विभागाचे आहेत. राज्य शासनाने पारदर्शी प्रशासन व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या आर्थिक उलाढालीवर शासनाचा अंकुश ठेवण्यासाठी वर्ग- १ ते ३ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी आपल्या आर्थिक मालमत्तेचे विवरण संबंधित खातेप्रमुखांकडे सादर करणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र नागरिक सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या नियम १९ च्या पोटनियम (१) व त्याखालील टीप ३ नुसार प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी शासनाच्या कुठल्याही सेवेत दाखल झाल्यानंतर प्रथम नियुक्तीच्या वेळी व त्यानंतर शासनाने दिलेल्या सूचनेनुसार यापुढे आपल्या चल व अचल मालमत्तेचे विवरण देणे बंधनकारक केले आहे. पूर्वी केवळ उच्च पदस्थ असलेल्या अधिकाऱ्यांनाच दरवर्षी आपल्या मालमत्तेचे विवरणपत्र शासनाला सादर करावे लागत होते. दोन वर्षांपासून शासनाच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या इतरही कर्मचाऱ्यांना मालमत्ता व दायित्व याची वार्षिक विवरणे सादर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालमत्ता किती याची गोपनीय माहिती शासनाकडे ठेवली जाणार आहे. शासकीय सेवेत काम करताना गैरमार्गाने मालमत्ता वाढविण्याचे प्रमाण अलीकडेच वाढल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यामुळे यावर शासनाचा अंकुश राहावा व गैरप्रकाराला आळा घालून पारदर्शी प्रशासनासाठी हा नवा पायंडा पाडला गेला आहे. शासकीय सेवेतील गट ‘अ’ मध्ये मोडणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेची माहिती संबंधित कार्यालय प्रमुख आणि विभागप्रमुख यांच्यामार्फ त शासनाकडे सादर करावी. तर गट ‘ब’ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या मालमत्तेचे विवरण सीलबंद पाकिटाद्वारे संबंधित विभाग प्रमुखांकडे सादर करावे आणि गट ‘क’ मधील कर्मचाऱ्यांनी विवरणपत्र सादर करताना ते ज्या विभागात कार्यरत आहेत, त्या विभागातील कार्यालयीन प्रमुखांकडे ही माहिती द्यावी, असे निर्देश आहेत.