शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण

By admin | Updated: October 12, 2016 01:16 IST

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिच्या आई व बहिणीस मारहाण करणाऱ्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिच्या आई व बहिणीस मारहाण करणाऱ्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.रांजणगाव शेणपुंजी येथील एक अल्पवयीन मुलगी आई व लहान बहिणीसोबत किरायाच्या घरात वास्तव्यास आहे. त्या मुलीची आई वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला जाऊन मुलांचे शिक्षण व कुटुंबाचे पालन-पोषण करते. या महिलेची १६ वर्षीय मुलगी रांजणगावातील एका महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करीत असताना आरोपी कल्लू म्हस्के (रा.कृष्णानगर, रांजणगाव) हा सतत पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून तिची छेड काढीत होता. पंधरा दिवसांपासून हा छेडछाडीचा प्रकार सुरू असल्यामुळे त्या तरुणीने या प्रकाराची माहिती घरी आल्यानंतर आईला दिली होती. त्यामुळे त्या मुलीच्या आईने आरोपी कल्लू म्हस्के यांच्या घरी जाऊन त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता कल्लू याने त्या मुलीच्या आईस शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे सदर महिलेने ९ आॅक्टोबरला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रोडरोमिओ कल्लू म्हस्के यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी कल्लू म्हस्के याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ताहेर पटेल करीत आहेत.