शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

दोन तपांच्या गुन्हेगारीचा थरारक शेवट

By admin | Updated: December 15, 2014 00:47 IST

बीड : खून, दरोडे, लूटमार, प्राणघातक हल्ला अशा गंभीर प्रकरणात अडकलेल्या शाम भीमराव आठवले (वय ४४, रा. माळीवेस, बीड) याचा रविवारी पोलिसांशी झालेल्या ‘फिल्मीस्टाईल’ चकमकीत थरारक अंत झाला.

बीड : खून, दरोडे, लूटमार, प्राणघातक हल्ला अशा गंभीर प्रकरणात अडकलेल्या शाम भीमराव आठवले (वय ४४, रा. माळीवेस, बीड) याचा रविवारी पोलिसांशी झालेल्या ‘फिल्मीस्टाईल’ चकमकीत थरारक अंत झाला. गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे पोलिस आणि आठवले यांच्यात दहा मिनिटे चकमक उडाली. २४ तास शस्त्रास्त्रांसह वावरणारा शाम अखेर पोलिसांच्या बंदुकीचा निशाणा ठरला. मागील दोन तपांपासून तो गुन्हेविश्वात होता. त्याने पोलिसांना अक्षरश: जेरीस आणले होते. शाम आठवले! जिल्ह्याच्या गुन्हेजगतातील एक कुप्रसिद्ध नाव! साधारण १९९२ मध्ये खुनासारख्या गंभीर गुन्ह्यापासून त्याने गुन्हे जगतात ‘एंट्री’ केली अन् पुढे त्याचे धाडस वाढतच गेले. पोलिस अन् शाम यांच्यात लपाछपीचा खेळ रंगतच गेला. त्याच्याविरुद्ध तब्बल २० गुन्हे नोंद आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी ठाणे, बीडमधील शिवाजीनगर व पेठ बीड ठाण्यातील प्रत्येकी एक फिर्याद वगळता उर्वरित १७ गुन्हे त्याने बीड शहर ठाणे हद्दीत केले आहेत. १९९३ मध्ये त्याच्याविरुद्ध दुसरी फिर्याद दाखल झाली. १९९५ मध्ये मारहाणीचे दोन गुन्हे नोंद झाले. १९९६ मध्ये चोरी, मारहाण व प्राणघातक हल्ला असे तीन गुन्हे करुन त्याने स्वत:च्या क्राईमरेकॉर्डमध्ये भरच टाकली. १९९७, १९९९, २००० व २००१, २००२ मध्येही तो गुन्हे करतच राहिला. २००३ मध्ये त्याच्या नावावर दोन गुन्हे नोंद करण्यात आले. २०११, २०१२ मध्ये प्रत्येकी एक व २०१४ मध्ये दोन गुन्हे केल्याची फिर्याद आहे. दिवाळीपासून होते पोलिस मागावरऐन दिवाळीच्या धामधुमीत शाम आठवले याने बीड शहरातील माळीवेस परिसरातील एका दुकानावर गोळीबार करत दहा लाखांचा दरोडा टाकला होता. या प्रकरणात सनी व अक्षय ही त्याची दोन मुलेही आरोपी आहेत. गुन्ह्यासाठी त्याने इंदौरहून खास आरोपीही मदतीला घेतले होते. या गुन्ह्यानंतर तो रातोरात फरार झाला होता. तेंव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. तो धोंडराईत दडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर सापळा लावला गेला;परंतु चकमकीत तो पोलिसांच्या गोळीचा निशाणा ठरला.मोक्क्याची झाली होती तयारीशाम आठवले याने गुन्हेविश्वात अवघ्या काही वर्षांतच जम बसविला होता. गुन्हा करायचा... पसार व्हायचे... पकडल्यावर जामिनावर सुटायचे अन् पुन्हा गुन्हे करतच रहायचे... असा त्याचा एककलमी कार्यक्रम होता. माळीवेसमध्ये दिवाळीत दुकान लुटल्यावर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाईची रणनीती होती. मात्र, त्याआधीच तो ठार झाला. (प्रतिनिधी)४शाम आठवले कायम शस्त्रे जवळ बाळगून वावरत असे. तो धोंडराईत दबा धरुन बसल्याची माहिती कळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पूर्ण तयारीनिशी गेले होते. ४अपेक्षेप्रमाणे त्याने पोलिसांच्या दिशेने चार फायर केलेच;परंतु पोलिसांनी ते चुकविले. ४आठवलेकडील बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या पोलिसांच्या वाहनांचा निशाणा ठरला. ४प्रत्यूत्तरादाखल पोलिसांनी पोलिसांनी धरलेला नेम मात्र चुकला नाही. या निशाण्याने शामला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच तो मृत्यूमुखी पडला. ४दहा मिनिटे हा थरार सुरु होता, अशी सूत्रांची माहिती आहे.