शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विकतच्या पाण्यावर भागतेय तहान !

By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST

बालाजी थेटे , औराद शहाजानी २५ हजार लोकसंख्या असलेले औराद शहाजानी हे गाव दोन नद्यांच्या संगमावरील तीन कोल्हापूरी पाटबंधाऱ्याच्या कुशीत असतानाही

बालाजी थेटे , औराद शहाजानी२५ हजार लोकसंख्या असलेले औराद शहाजानी हे गाव दोन नद्यांच्या संगमावरील तीन कोल्हापूरी पाटबंधाऱ्याच्या कुशीत असतानाही गेल्या तीन महिन्यांपासून गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ गेल्या दोन महिन्यांत ग्रामपंचायतीने दोनदा १० टँकरची मागणी करुन प्रशासनाकडे प्रस्तावही सादर केला़ पण अद्याप एकही सरकारी टँकर गावात सुरु झाले नाही़ त्यामुळे गावकऱ्यांना आपली तहान खाजगी ४ टँकर व ६० लहान टमटमच्या विकतच्या पाण्यावर भागवावी लागत आहे़तेरणा- मांजरा संगमावरील औराद शहाजानी हे ग्रीन बेल्ट म्हणून नावारूपाला आले आहे़ हा परिसर नेहमी हिरवा शालू पांघरलेला होता़ पण सततच्या दुष्काळामुळे मांजरा, तेरणा कोरड्या पडल्याने यावरील आठही कोल्हापुरी बंधारे कोरडी पडली आहेत़ ३ हजार हेक्टर जमीन कायमस्वरूपी सिंचन क्षेत्राखाली होती़ परंतु, गेल्या तीन वर्षांत पाण्याअभावी वाळवंटासाखरी परिस्थिती झाली आहे़ सिंचन तर सोडाच पण पिण्यासाठी घागरभर पाणी मिळणेही कठीण झाले आहे़ औरादच्या योजना निम्या गावात नळयोजना आहे़ या नळाला महिन्याला एकदा पाणी येत असले तरी केवळ काही मिनिटेच पाणीपुरवठा होतो़ ग्रामपंचायत मालकीचे ४१ बोअर आहेत़ यापैकी ३४ बोअर बंद पडले आहेत़ ७ विंधन विहिरी थोडाफार वेळ चालतात़ ग्रामपंचायतीने २६ जानेवारीला पंचायत समितीकडे १० टँकर व १० विंधन विहिर अधिग्रहण करण्याची मागणी करुन प्रस्तावही सादर केला़ पण त्यानंतर तहसीलदारांनी औराद शहराची पाहणी करून टँकर ऐवजी जवळच्या विंधन विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या़ त्यानंतर तीन विंधन विहिरी अधिग्रहण केल्याचे ग्रामविकास अधिकारी टी़ डी़ बिराजदार म्हणाले़ पुन्हा १५ मार्चला ग्रामपंचायतीने चार टँकर सुरु करावेत, अशी मागणी केली आहे़ पण प्रशासनाने पाहणी करण्यात निम्मा उन्हाळा घालवला़ पण मागणीचे टँकर काही कागदावरून जमिनीवर आलेच नाहीत़