शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना २० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरात ऑक्टोबर २०१७ रोजी २२ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना २० वर्षांची सक्तमजुरीची ...

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरात ऑक्टोबर २०१७ रोजी २२ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संजय कुलकर्णी यांनी एससी आणि एसटी (पीओए) कायद्याअंतर्गत ठोठावली आहे.

सक्तमजुरीची शिक्षा ठोठविण्यात आलेल्या आरोपीमध्ये सागर सुभाष बुट्टे (२० वर्ष, रा. जयभवानीनगर, ग. न.५), अनिल अंबादास डुकले ( २६ वर्ष, रा. जयभवानीनगर, ग. न. १) उमेश उत्तम डुकले (२२ वर्ष, रा. जयभवानीनगर, ग. न. १) यांचा समावेश आहे.

जयभवानीनगर चौकात विवाहित महिला ५ ऑक्टोबर २०१७ रोजी रात्री ८ वाजता उभी होती. वरील तिन्ही आरोपी (एमएच २०-ईएफ ०५७२) रिक्षातून आले व त्या महिलेला रेल्वेस्टेशन येथे सोडविण्यासाठी तिला रिक्षात बसविले. त्यानंतर आरोपींनी रिक्षात गॅस भरावयाचा आहे, असे सांगून मुकुंदवाडी येथील रामकाठी येथे नेले. तिथे बाहेरील बाजूस बंद शटर व पाठीमागील बाजूस पडीक भिंत असलेल्या खोलीमध्ये नेले व त्या महिलेस लोखंडी रॉडने मारहाण केली व त्यानंतर त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तपास पूर्ण करून पोलिसांनी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीत सरकारपक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. घटनेवेळी पीडितेला झालेल्या एकूण १४ जखमा डॉक्टरचा अहवाल व साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी तीनही आरोपींना सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपीकडून मिळणाऱ्या दंडाची रक्कम मिळून ९९ हजार रुपये ही फिर्यादी पीडितेला मोबदला म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले.