उस्मानाबाद : कमी किमतीत सोन्याचे दागिने देण्याचा बहाणा करीत महिलांसह नागरिकांना लूटणाऱ्या तीन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़ ही कारवाई मंगळवारी करण्यात आली असून, शिंगोली येथील एका इसमाला फसविण्याचा डावही पोलिसांनी उधळून लावला आहे़स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना बसस्थानक परिसरात तीन महिला संशयितरित्या फिरत असताना त्यांना आढळून आल्या़ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्या महिला कमी किमतीत अधिक सोने देण्याचा बहाणा करून लोकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले होते़ यावरून पोलिसांनी सारिका अप्पा भोसले (वय-२६), चंगाबाई श्रीमंत भोसले (वय-५० दोघी रा़ झाडीबोरगाव ता़बार्शी), अलका सुजाण पवार (वय-४० रा़ पांगरी ता़बार्शी) या तिघींना ताब्यात घेतले़ विशेष म्हणजे या तिघी शिंगोली येथील अजित ज्ञानोबा चव्हाण या इसमाला मंगळवारी सकाळी फसविण्याच्या तयारीत होत्या़ ही कामगिरी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विशाल शहाणे, मसपोफौ खंडागळे, पोहेकॉ जगताप, पोना थोरात, पोना जाधव, पोकॉ दहिहांडे यांनी केली़ (प्रतिनिधी)
तीन महिला जेरबंद
By admin | Updated: September 16, 2015 00:31 IST