शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील चौकात वाहतुकीचे तीनतेरा

By admin | Updated: June 19, 2014 00:51 IST

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सिडको, हडको परिसरातील वाहतूक सिग्नलचे तीनतेरा वाजले असून, शाळा सुरू झाल्यामुळे तर वाहतुकीत आणखी भर पडली आहे.

साहेबराव हिवराळे , औरंगाबादसिडको, हडको परिसरातील वाहतूक सिग्नलचे तीनतेरा वाजले असून, शाळा सुरू झाल्यामुळे तर वाहतुकीत आणखी भर पडली आहे. जालना रोडवरील मुकुंदवाडी चौक, प्रोझोन मॉलसमोर, जालना रोडवरील चौक, सिडको बसस्थानक, एन-३ समोरील अग्रसेन चौकातील सिग्नल बंद, तर गारखेड्यातील गजानन मंदिर चौकात सुरू आहेत. सूतगिरणी चौकात बंद, हडको- सिडकोतील होळकर चौकातील सिग्नल सुरू, तर टीव्ही सेंटर येथील सिग्नल बंद आहेत. हर्सूल टी-पॉइंटवर सिग्नल नाही; परंतु सिडको पोलीस ठाण्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कॅमेऱ्यात कोंडीचे चित्रण होऊनही पोलीस मात्र तेथे हस्तक्षेप करीत नाहीत. जळगाव रोडवरील एन-१ च्या चौकातील सिग्नल रस्त्याच्या कामामुळे बंद असल्याचे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांंनी सांगितले. या चौकात सिनेमा थिअटर्स असून मॉल तसेच कारखान्यांत ये-जा करणाऱ्यांची सतत वर्दळ असते. नियंत्रणासाठी एकही सिग्नल अथवा कर्मचारी नाहीबजरंग चौकातील सिग्नलही बंदच असून, आंबेडकर चौक, नवीन मोंढ्यात व पिसादेवीकडे जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. वाहतूक मोठ्या प्रमाणात असूनही येथे नियंत्रण ठेवण्यासाठी एकही सिग्नल अथवा वाहतूक कर्मचारी दिसत नाही. चौकालगतच वाहतूक शाखेचे कार्यालय असले तरी ते अधिकाऱ्यांनाही वाहतूक प्रश्नाचे गांभीर्य वाटत नसल्याचे दिसते. बळीराम हायस्कूल चौक, अधिकारी मेस, यशोधरा कॉलनी, आझाद चौक, एन-६, चिश्तिया चौक, गरवारे स्टेडियम चौक, गुलमोहर कॉलनी या ठिकाणी पिवळा दिवा असलेले सिग्नल लागतच नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची भीती नगरसेवक सुरेश इंगळे, रिपाइंचे शहराध्यक्ष विजय मगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील जगताप, शिवसेनेचे कमलाकर जगताप, काँग्रेसचे अशोक डोळस यांनी व्यक्त केली. अधिकारी म्हणतात की, मनपाकडून दुरुस्ती होत नाही. विजेअभावी अनेक सिग्नल बंद असून, बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे काम सुरूच आहे. सिग्नलची गरजवाहने बेशिस्तपणे चौकात कोणत्याही दिशेने पळविले जातात.कामगारांना सुरक्षिततेसाठी मुकुंदवाडीतील सिग्नल गरजेचे.जळगाव रोडवरील सिडको कार्यालयासमोरील बँकेच्या चौकातील सिग्नल सुरू करा.आंबेडकर चौकात सिग्नलच नसल्याने कोंडी वाढते.टीव्ही सेंटर हडकोतील चौकातील सिग्नल अनेक दिवसांपासून बंद.सूतगिरणी गारखेडा चौकातील सिग्नल देखावा.गजानन महाराज मंदिर चौकातील सिग्नल अनेकांना गोंधळात टाकतात.