शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडमध्ये तीन कत्तलखान्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:09 IST

सिल्लोड शहरात अवैधरीत्या सुरु असलेल्या तीन कत्तलखान्यांवर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांनी छापा मारून अठरा वाहनांसह तब्बल चाळीस टन मांस जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : सिल्लोड शहरात अवैधरीत्या सुरु असलेल्या तीन कत्तलखान्यांवर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांनी छापा मारून अठरा वाहनांसह तब्बल चाळीस टन मांस जप्त केले. तर कत्तलीसाठी टेम्पोत भरून आणलेली सात जनावरे व कत्तलखान्यात बांधून ठेवलेली जिवंत ११ जनावरे अशी एकूण अठरा जनावरेही पोलिसांनी ताब्यात घेतली.तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी छापा मारून ताब्यात घेतला आहे. एवढ्या मोठ्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी बिराजदार हे आपल्या घराकडून कार्यालयाकडे जात असताना त्यांना जनावरे भरून जात असलेला टेम्पो दिसल्याने त्यांनी त्यास थांबण्याचा इशारा केला; मात्र टेम्पोचालकाने वाहन न थांबवता भरधाव शहरातील ईदगाहकडे पळ काढला. बिराजदार यांनी त्याचा पाठलाग केला असता ईदगाहजवळ चालकाने टेम्पो थांबवून तेथून पळ काढला. बिराजदार यांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात सात जनावरे असल्याचे दिसल्याने त्यांनी टेम्पो जनावरासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावला.या कारवाईत दोन ट्रक अंदाजे किंमत १५ लाख रुपये, पाच टेम्पो अंदाजे किंमत २० लाख, चार बोलेरो पिकअप अंदाजे किंमत १६ लाख, एक टोयोटा क्वालिस गाडी अंदाजे किंमत ४ लाख, एक सेंट्रो कार अंदाजे किंमत २ लाख, तीन आयशर वाहने अंदाजे किंमत २४ लाख, एक बजाज पल्सर मोटारसायकल अंदाजे किंमत २० हजार, एक टेम्पो अंदाजे किंमत ५ लाख, १८ जिवंत जनावरे अंदाजे किंमत १ लाख ८० हजार तसेच तब्बल ४० टन मांस अंदाजे किंमत ५६ लाख रुपये असा एकूण १ कोटी ४४ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांची कुणकुण लागताच आरोपी फरार झाले. यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लावली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांनी सांगितले.मुंबई व विदेशात मांस रवानासदर मांस हे सिल्लोडहून मुंबई व नंतर विदेशात नेण्यात येते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. ईदगाह रोडवरील ५ पैकी ३ कत्तलखान्यावर शनिवारी धाडी घालण्यात आल्या. रात्री उशीरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.असा आला संशयबिराजदार यांनी जनावरे भरलेला टेम्पो ईदगाहच्या दिशेनेच का गेला याची चौकशी सुरु करुन शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगीरथ देशमुख, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. विश्वास पाटील, अजिंठा ठाण्याचे सपोनि. किरण आहेर यांना तातडीने फौजफाट्यासह शहरात बोलावून घेतले व तिन्ही कत्तलखान्यांवर छापा मारला असता त्यांना शेकडो जनावरांची कत्तल झालेली दिसली. सर्वत्र मासच मास दिसल्याने पोलीसही चक्रावून गेले.जनावरांच्या चरबीचे केले तूपकत्तलखान्यांची भीषणता पाहून पोलिसांनी तपासाला वेग दिला असता कत्तलखान्यात जवळपास १५० डबे वनस्पती तूप सापडले. हे तूप जनावरांच्या चरबीपासून तयार करण्यात आलेले असून तेही पोलिसांनी जप्त केल्याने मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा त्यांना विरोध करण्यासाठी १०० ते १५० महिला हातात लाठ्या व दगड घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. यामुळे शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.