शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन शहरात तीन टपर्‍या जळून खाक; ७ लाखांचे नुकसान

By admin | Updated: June 1, 2014 00:28 IST

भोकरदन : पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या तीन टपर्‍यांना गुरूवारी रात्री ११ वाजेदरम्यान अचानक आग लागल्याने टपर्‍या पूर्णपणे जळून खाक झाल्या.

भोकरदन : पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या तीन टपर्‍यांना गुरूवारी रात्री ११ वाजेदरम्यान अचानक आग लागल्याने टपर्‍या पूर्णपणे जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पंचायत समिती परिसरातील गणपती झेरॉक्स या दुकानातील कृषी विद्यापीठ नाशिक यांनी काही झेरॉक्ससाठी ठेवलेल्या प्रकल्पासह इतर ग्राहकांचा मूळ दस्तऐवजसुद्धा जळून खाक झाला. तसेच झेरॉक्स मशीन, संगणक आदी साहित्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकानमालक विष्णू शेंद्रे यांनी सांगितले. याच शेजारी शिवाजी जनरल स्टोअर्समधील साहित्यासह फ्रीजही जळून खाक झाले. यात ३ लाख ५० हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रभाकर चक्के यांनी सांगितली. त्या शेजारीच असलेल्या एकता जेन्टस् पार्लर या दुकानालाही आग लागल्यामुळे विविध साहित्य जळून खाक झाले. यात ५० हजारांचे नुकसान झाल्याचे शिवाजी वरपे यांनी सांगितले. आगीची घटना कळताच शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या कर्मचार्‍यांसह परिसरातील नागरिकांनी आग विझविली. विशेष म्हणजे आग लागल्याचे कळाल्यानंतरही पोलिस घटनास्थळी फिरकलेही नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, या प्रकारानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)