शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

वाळूचे तीन टिप्पर जप्त

By admin | Updated: April 23, 2015 00:45 IST

जालना : जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असून त्यानिमित्त जलयुक्त शिवार अभियान व मग्रारोहयोसंबंधी कामांच्या पाहणीसाठी जात असताना

जालना : जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असून त्यानिमित्त जलयुक्त शिवार अभियान व मग्रारोहयोसंबंधी कामांच्या पाहणीसाठी जात असताना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना २२ एप्रिल रोजी विविध ठिकाणी तीन वाळूचा अवैध उपसा करणारे टिप्पर आढळून आले. हे तिन्ही वाहने त्यांनी पकडून संबंधित तहसील कार्यालयाच्या स्वाधीन केले आहेत.अंबड तालुक्यातील पारनेर येथे जाताना जिल्हाधिकारी नायक यांना एम.एच.डी-६३७२ या क्रमांकाचे वाहन वाळूची वाहतूक करताना आढळले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपले वाहन थांबवून टिप्पर चालकास रॉयल्टीच्या पावतीची मागणी केली असता ती नव्हती. संबंधित वाहनचालकाचा परवाना व कागदपत्रे तात्काळ घेऊन टिप्पर जप्त केले. सदरील टिप्पर आरटीओ कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश अंबड तहसीलदारांना दिले. या पाठोपाठ रामनगर व परतूर येथेही प्रत्येकी एक वाळूचे टिप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. सदरील वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.पाणीटंचाई निवारणार्थ अंबड व घनसावंगी तालुक्यात काही गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी जिल्हाधिकारी नायक यांना सांगितले. अंबड तालुक्यातील हादगाव आणि पारनेर तसेच घनसावंगी तालुक्यातील बेलगाव हातडी येथील जलयुक्त शिवार अभियान व मग्रारोहयो पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. घनसावंगी नगर पंचायतीमध्ये अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी नरेगाच्या कामामध्ये सुधारणा, मजुरांना पाणी पुरविणे, आधारकार्ड जागेवरच तात्काळ काढणे, मजुरांना शेड उभारणी व योग्य त्या सोयी तालुका प्रशासनाने जास्तीत जास्त उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी नायक यांनी या दौऱ्यात केल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदमाकर केंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, घनसावंगी व अंबड येथील गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.४यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध कामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.